मुक्तपीठ टीम
पुण्यातील कात्रज घाट परिसरातील डोंगरावर मोठी आग लागली आहे. सायंकाळी ही आग लागली आहे. आग मोठी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
कात्रज घाट डोंगराच्या परिसरात ज्या भागाला आग लागली आहे तो घाटाच्या पलिकडचा आहे. त्या भागाची जबाबदारी वन खात्याच्या भोर विभागाकडे आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग कात्रजच्या सभोवतालच्या परिसरातूनही दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदवीधर संघाचे शहराध्यक्ष माधव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज बोगद्याच्यावर डोंगराला ही भयानक आग लागली आहे. नविन बोगद्याच्यावर शिंदेवाडीच्या अगोदर चार पाच किलोमीटरपर्यंत आगीचे प्रमाण प्रचंड भयानक दिसत आहे. त्यामुळे ती कदाचित वाढूही शकतं. वन विभागाने या आगीकडं लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.