Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

“गडचिरोली पोलीस दलाची अभिमानास्पद कामगिरी,नक्षल कॅम्प केला उद्ध्वस्त”

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले 

March 8, 2021
in सरकारी बातम्या
0
anil deashmukh

मुक्तपीठ टीम

नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या भामरागड उपविभागांतर्गत येणाच्या मुरुमभुशी गावाजवळील महाराष्ट्र-छत्तीसगढ़ सीमेवरील जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलाने विशेष नक्षलविरोधी अभियान राबवून नक्षल कॅम्प उद्ध्वस्त करण्याची अभिमानास्पद कामगिरी केली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

 

या पथकाचे जवान (सी-६०) नक्षलविरोधी अभियान राबवित होते. सलग २ दिवस राबविलेल्या अभियानात ०४ मार्च च्या पहिल्याच दिवशी पथकाला संशयास्पद नक्षल दलम आढळून आले. नक्षलवाद्यांनी प्रथम पोलीस जवानांवर गोळीबार केला. जवानांनी त्यास चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यामुळे माघार घेत नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. त्या भागात शोध मोहीम राबविली असता, त्या परिसरात नक्षलवाद्यांनी लावलेला मोठा कॅम्प आढळला. तो कॅम्प सी-६० जवानांनी उद्ध्वस्त करुन टाकला तसेच त्या कॅम्पमध्ये शस्त्र बनविण्याच्या मशिनरी, स्फोटके व हत्यारे आदी साहित्य सापडले. ते ही सी-६० जवानांनी जप्त केले. परत येत असतांना सी-६० पथकावर पुन्हा नक्षलवाद्यांकडून जोरदार गोळीबार झाला. त्यास पोलीस पथकाने प्रत्युत्तर दिले. तेव्हा नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला.

 

सदर जंगल परिसरात नक्षल्यांचे शस्त्र तयार करण्याचे साहित्य आढळल्याने त्या भागात नक्षल असल्याचा संशय बळावला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ०५ मार्च रोजी पुन्हा त्याच भागात अभियान तीव्रपणे राबविण्यासाठी आणखी विशेष अभियान पथक (सी-६०) घटनास्थळावर पाठविण्यात आले. विशेष अभियान पथकाच्या दोन्ही समुहांवर पुन्हा नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. तेव्हा सी-६०च्या बहादूर जवानांनी नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले यात नक्षलवाद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सी-६० पथकाच्या उत्कृष्ट अभियान रणनिती व बळाच्या जोरावर नक्षलवाद्यांना पळवून लावण्यात जवानांनी यश मिळविले. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या अबुझमाड सारख्या नक्षलीदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात जाऊन सी-६० च्या बहादूर जवानांनी नक्षलचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळे माड भागातील नक्षलवादाला जबर हादरा बसला. याचा फायदा तेथील नक्षली कारवाया कमी होण्यास नक्कीच होईल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे.


Tags: अभियानगृहमंत्री अनिल देशमुखजवाननक्षलवादी
Previous Post

“रखडलेल्या व प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार”

Next Post

बंगालच्या लढाईत प्रशांत किशोर का बनत आहेत खलनायक?

Next Post
prashant kishor

बंगालच्या लढाईत प्रशांत किशोर का बनत आहेत खलनायक?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!