मुक्तपीठ टीम
गेल्या १०९ हून अधिक दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय परत जाणार नसल्याचा दृढ संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच दीर्घ संघर्षाच्यादृष्टीने शेतकर्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी पक्की घरे बांधण्यास सुरुवात केली आहे.
कधी थंडी, तर कधी पाऊस, कधी पोलिसांच्या लाठ्या खात शेतकरी आंदोलन करत आहे. आता उन्हाळा लागला आहे. दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे थंडी पडते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऊनही पडते. उन्हापासून वाचण्यासाठी बांबूची घरं तयार करण्यास सुरुवात केली आहे.
कशी असणार आंदोलक शेतकऱ्यांची घरे?
- सरकारला एक दिवस सर्व कायदे मागे घ्यावे लागतील, परंतु ही दीर्घ लढाई लढण्यासाठी आंदोलकांच्या सुविधांचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
- सीमेवर मजबूत घरे बांधली जात आहेत.
- सिंघू सीमेवर शेतकऱ्यांनी बांबूपासून २५ फूट लांब आणि १२ फूट रुंद आणि १५ फूट ऊंचीचं बाबूची घरं बनवली आहेत.
- उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून या घरात कुलर लावण्यात आले आहेत.
- कमालीच्या उन्हापासून बचावासाठी पक्की घरे बनवली जात आहेत.
- आंदोलनात सहभागी असलेल्या वृद्ध महिलांसाठी या घरांमध्ये एसीही लावण्यात येतील.”
- काही ठिकाणी घरासाठी वीट आणि सिमेंट तर काही ठिकाणी वीट आणि माती वापरुन घरं तयार केली जात आहे.
- सिंघू सीमेवर बांबूचे घर तर दुसरीकडे टिकरी सीमेवर डझनभर पक्की घरं तयार करण्यात आली आहेत.
- टिकरी सीमेवर अनेक ठिकाणी आता वीटांच्या भिंती केल्या आहेत. दरवाजे लावले जात आहे.