मुक्तपीठ टीम
मुंबईत आरे जंगलातच मेट्रो कारशेड उभारण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा अट्टाहास आहे. त्या विरोधात सातत्यानं आंदोलने होत आहेत. पर्यावरणप्रेमींप्रमाणेच शिवसेना, काँग्रेस आणि डाव्या पक्षांकडूनही कारशेडला विरोध करण्यात येत आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन मार्गाचे कारशेड आरेमध्ये उभारण्याचा निर्णयाविरोधात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसही रस्त्यावर उतरली आहे. अॅड. अमोल मातेलेंच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले.
*मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे”आरे” मेट्रो कारशेड विरोधात जोरदार आंदोलन .
*मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिंदे फडणवीस सरकारने आरे मेट्रो कारशेड पुनश्च आरे कॉलनीत बांधण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरुद्ध आज बिरसा मुंडा चौक, युनिट 25, गणेश pic.twitter.com/pcTB0W473w
— Adv.Amol Matele ॲड.अमोल मातेले (@AdvAmolMatele) August 28, 2022
आरे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. आरे वाचवासाठी काँग्रेसनं मागील रविवारी आंदोलन केले होते आणि आता राष्ट्रवादी कांग्रेसनेही यात सहभाग घेतला आहे. आरेमधील कारशेड रद्द करून मुंबईचे फुप्फुस वाचवावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौक, युनिट २५, गणेशनगर येथे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने ‘मेट्रो ३’ची कारशेड आरे वसाहतीमध्येच उभारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि राजकारणी पक्ष यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती. शिंदे सरकार सत्तेत आल्यावर आदित्य ठाकरे थेट आरे जंगलात पोहचले होते. आज आरे परिसरात सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी झाले. एमएमआरसीएल आरे छोडो, शिंदे-फडणवीस आरे छोडो’ अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी पिकनिक पॉईंट परिसरात दिल्या आहेत. जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत प्रत्येक रविवारी आंदोलनं सुरू राहणार आहे.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिंदे फडणवीस सरकारने आरे मेट्रो कारशेड पुन्हा आरे कॉलनीतच बांधण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरुद्ध आज गणेश नगर, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे जोरदार आंदोलन केले. यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ऍड. अमोल मातेले यांनी असंसदीय सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान सरकार विरोधात हातात फलक घेवून आरे वाचवा, प्रदूषण थांबवा अशा घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर इडीचे सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी ५० खोक्यांची वसूली करण्यासाठी अतिरिक्त १० हजार कोटीची तरतूद केल्याचा आक्षेप ऍड. अमोल मातेले यांनी केला आहे. यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती.विद्याताई चव्हाण,मुंबई कार्याध्यक्ष मा .श्री नरेंद्र राणे, मा.सौ. राखीताई जाधव, अजित रावराणे, धनंजय पिसाळ, इंद्रपाल सिंग, आर्षद आमिर मुंबई पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, प्रदेश प्रतिनिधी, तालुकाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, कार्यकर्ते व अनेक मुंबईकर उपस्थित होते.