Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात २३ नवीन संवर्धन राखीव, ५ अभयारण्ये

पर्यावरणस्नेही विकासाचा आग्रह कायम- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

June 16, 2022
in सरकारी बातम्या
0
Thane Creek Flamingo Sanctuary

मुक्तपीठ टीम

राज्यात मागील अडीच  वर्षात  १७५०.६३ चौ.कि.मीचे २३ नवीन संवर्धन राखीव,  ६४७.१२९४  चौ.कि.मी ची  ५  नवीन अभयारण्ये आणि  ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित  महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित असून या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्गही सुरक्षित होतांना दिसत आहे.  शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.            

नव्याने निर्माण करण्यात आलेल्या २३ संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी ९ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित झाले असून उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

ही आहेत संवर्धन राखीव क्षेत्र (क्षेत्र चौ.कि.मी)            

राज्यात मागील अडीच वर्षाच्या काळात जी नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित झाली आहेत त्यामध्ये   कोल्हापूर वनवृत्तातील तिलारी, जि. कोल्हापूर (२९.५३) जोर जांभळी-जि.सातारा (६५.११), आंबोली दोडामार्ग (५६.९२)- जि.सिंधुदूर्ग, विशाळगड- जि. कोल्हापूर (९२.९६), पन्हाळगड- जि. कोल्हापूर (७२.९०), मायणी पक्षी संवर्धन-.जि. सातारा,  (८.६७), चंदगड- जि. कोल्हापूर (२२५.२४), गगनबावडा- जि. कोल्हापूर (१०४.३९), आजरा भुदरगड – जि.कोल्हापूर (२३८.३३),मसाई पठार –जि. कोल्हापूर (५.३४),  नागपूर वनवृत्तातील मुनिया –  जि. नागपूर,  (९६.०१),  मोगरकसा- जि. नागपूर (१०३.९२), अमरावती वनवृत्तातील महेंद्री-जि. अमरावती  (६७.८२),  धुळे वनवृत्तात चिवटीबारी- जि. धुळे (६६.०४), अलालदरी- जि. धुळे (१००.५६), नाशिक वनवृत्तातील कळवण-जि. नाशिक (८४.१२), मुरागड-जि. नाशिक (४२.८७), त्र्यंबकेश्वर-जि. नाशिक (९६.९७), इगतपुरी-जि. नाशिक (८८.५०),  ठाणे वनवृत्तातील रायगड संवर्धन राखीव- जि. रायगड (४७.६२), रोहा संवर्धन राखीव- जि. रायगड (२७.३०), पुणे वनवृत्तातील भोर-जि. पुणे,  ( २८.४४), कोल्हापूर वनवृत्तातील दरे खुर्द (महादरे)- जि. सातारा (१.०७),  यांचा समावेश आहे. यातील तिलारी, जोर जांभळी, आंबोली दोडामार्ग, विशाळगड, पन्हाळगड,  मायणी, चंदगड, मुनिया आणि महेंद्री  ही ९ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित झाली आहेत.

पाच अभयारण्ये  (क्षेत्र चौ.कि.मी)            

शासनाने चंद्रपूर वनवृत्तात  कन्हारगाव- जि. चंद्रपूर (२६९.४० चौ.कि.मी), विस्तारीत अंधारी वन्यजीव अभयारण्य-जि. चंद्रपूर ( ७८.४०), धुळे वनवृत्तातील मुक्ताई भवानी- जि. जळगाव (१२२.७४०), गडचिरोली वनवृत्तातील कोलामार्का- जि. गडचिरोली ( १७५.७२),  बुलडाणा वनवृत्तातील विस्तारीत लोणार वन्यजीव अभयारण्य- जि. अमरावती (.८६९४) अशी पाच अभयारण्ये याच कालावधीत घोषित केली आहेत.  यातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना निघाली असून उर्वरित अभयारण्याची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

जैवविविधता वारसा स्थळे (क्षेत्र हेक्टर)             

पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड (३३.०१), जळगाव जिल्ह्यातील लांडोरखोरी (४८.०८),  सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बांबर्डे मायरेस्टिका (२.५९) आणि शिुस्टुरा हिरण्यकेशी ही चार जैवविविधता वारसा स्थळे मागील अडीच वर्षाच्या काळात घोषित करण्यात आली असून या सर्वांची अधिसूचना निर्गमित झाली आहे.

रामसर दर्जा            

लोणारला रामसर साईट दर्जा मिळाला असून ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या रामसर दर्जाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.


Tags: ajit pawarcm uddhav thackerayjitendra awhadthaneThane Creek Flamingo Sanctuaryठाणेठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य
Previous Post

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

आता नवीन गॅस कनेक्शन घेणेही झालं महाग! जाणून घ्या किती पैसे लागणार…

Next Post
LPG Cylinder

आता नवीन गॅस कनेक्शन घेणेही झालं महाग! जाणून घ्या किती पैसे लागणार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!