Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवर मालमत्ता कर नसणार!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच बैठकीत चांगली बातमी!

January 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
cm uddhav thackeray and eknath shinde on tax reduction on 500 sq ft house

मुक्तपीठ टीम

शस्त्रक्रियेमुळे काही दिवस वैद्यकीय सल्ल्यामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर राहिलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीत मुंबईकरांसाठी चांगली बातमी देणारा निर्णय घेतला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत मुंबईतील ५०० चौरसफुटापर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर रद्द करण्यात आला आहे. लवकरच कायदेशीर प्रक्रियेनंतर तो निर्णय अंमलात येईल.

मुंबईकरांसाठी मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

शिवसेना १९६६पासून मुंबईसोबत!

  • आजपासून सुरु झालेलं नवं वर्ष सर्वांना सुखाचं समाधानाचं जावं, पुढचीही वर्षे तशीच जावीत.
  • अनेकांना वाटलं असेल मी टीव्हीवर दिसलो म्हणजे कोरोनावर बोलेन.
  • पण आज मी कोरोनावर बोलणार नाही, आवश्यकता भासू नये, तशी भासलीच तर मी बोलेन.
  • मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना आपली पाळंमुळं विसरून चालणार नाही.
  • १९६६साली जन्माला आलेली शिवसेना मुंबई सांभाळतेय.

 

ठाकरे घराण्याची चौथी पिढी मुंबईसोबत!

  • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: जाऊन रस्त्याची कामे कशी चाललीत ते पाहत असत.
  • मी स्वत: नालेसफाईच्या कामांची पाहणी करत असे. ती कामे मध्यरात्रीनंतर होतात. तेव्हा जात असे.
  • आता आदित्यनेही ते काम करत माझा भार कमी केला. संपूर्णच कमी केला.

 

आजकाल कुणी काहीही आश्वासनं देतात!

  • मुंबईकर म्हणजे त्यांनीच कर द्यायचा का?
  • आम्ही मोठे फलक लावतो, हे काम केले. पण ते कसे केले. लोकांच्या पैशातूनच केले.
  • त्यामुळे मला स्वत:ला असे फलक लावणे आवडत नाही.
  • आजकाल बरेच लोक असेही आहेत की जे चंद्रापासून उड्डाणपूल बांधू वगैरेही आश्वासने देतात.
  • नंतर विचारले तर निवडणूक होती म्हणून बोलल्याचे सांगतात.

 

२०१७मध्ये जे सांगितले ते आता केले! 

  • शिवसेनेची परंपरा आहे जे करणार तेच सांगायचे, जे जमेल तेच सांगायचे.
  • तीच परंपरा आपण आता पुढे नेत आहोत.
  • २०१७ला आपण एक वचननामा मांडला.
  • इतर देतात तो जाहीरनामा, शिवसेना देते तो वचननामा.
  • त्यातील बहुतेक वचन पूर्ण केलीत.
  • एक वचन राहिलेले ते म्हणजे ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर मुक्तीचा.
  • आज तेही वचन पूर्ण केले आहे. मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो.
  • मुंबईकरांना दिलासा देणारा, कष्टाने मुंबई उभारणाऱ्या मुंबईकरांच्या कष्टाचा मान राखणे आवश्यक आहे.
  • आम्ही जे बोलतो ते करतो, एकनाथजी तुम्ही म्हणालात तसे जानेवारीपासून तसे अधिकाऱ्यांनी या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी झालीच पाहिजे हे पाहावे.

 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली निर्णयाची माहिती

५०० चौरस फुटांपर्यंतची घरे करमुक्त!

  • मुंबईकरांसाठी क्रांतिकारी दिवस आणि महत्वाच्या निर्णयाचा दिवस आहे.
  • ५०० फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर सरसकट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • देशात आजवर असा सरसकट कर रद्द करण्याचा निर्णय कुणीही घेतलेला नाही.
  • मुंबई आणि शिवसेना यांचं नातं, जेव्हा जेव्हा मुंबईवर संकट आलं तेव्हा शिवसेना मुंबईसोबत राहिली.
  • मुंबईकरांनीही नेहमी शिवसेनेच्या पाठिशी उभी राहण्याचे काम केले.

 

उद्धव ठाकरे नेहमीच मुंबईसोबत!

  • माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही सातत्याने ते मुंबईसाठी प्रयत्नरत राहिले.
  • कोणतंही संकट आलं तरी ते पुढे सरसावत राहिले.
  • कोरोना संकटातही माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण कोरोना नियंत्रणात आणला.
  • धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीतही माननीय आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आपण काम केले. कोरोनावर मात केली.
  • आता रुग्णालयात असतानाही ओमायक्रॉनची सुरुवात झाल्यानंतरही माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला मार्गदर्शन करून माहिती घेतली.

 

५०० फुटांच्या करमुक्तीचा शब्द मा. उद्धव ठाकरेंचा, तो पूर्ण केला!

  • मला अनेकांनी विचारले ५०० फुटांच्या घरांच्या करमाफीचे काय?
  • मी त्यांना सांगितले, आपले नेते माननीय उद्धव ठाकरे यांनी ५०० चौरस फुटांच्या घरांना करमुक्तीचा शब्द दिला होता.
  • तो ते पूर्ण करणारच. आता ते त्याची घोषणा करतील.

 

LIVE https://t.co/NSiBU0ERzv

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 1, 2022


Tags: ५०० चौरस फुट घरांवर मालमत्ता कर नाहीcm uddhav thackeraymumbaino tax on 500 sq ft houseमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई
Previous Post

सर्दी-खोकला-ताप सारखी लक्षणे असल्यास रिपोर्ट येईपर्यंत मानले जाणार कोरोना संशयित

Next Post

“विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जागेत भव्य राष्ट्रीय स्मारक उभारावे” : रामदास आठवले

Next Post
BHIMA KOREGAON

"विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जागेत भव्य राष्ट्रीय स्मारक उभारावे" : रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!