Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन सुरू” – डॉ. राजेंद्र शिंगणे

May 2, 2021
in सरकारी बातम्या
0
rajendra shingane

मुक्तपीठ टीम

 

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्यादृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्रात उत्पादित होणारा आणि इतर राज्यातून प्राप्त होणारा ऑक्सिजन राज्यातील जिल्ह्यांना सुरळीत आणि आवश्यकतेनुसार प्राप्त व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे (एफडीए) राज्यातील ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठ्या बाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात आले आहे.

 

एफडीएमार्फत उत्पादकांना आज 1695 मे.टन ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्रातून सूचना दिल्या गेल्या आहेत. 30 एप्रिल रोजी 1608 टन द्रवरूप वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेला असून, काल रोजी 1674 टन ऑक्सिजनच्या वितरणाबाबतची माहिती उत्पादकांनी प्रस्तावित वितरण पत्रावरून दिली आहे.अन्न व औषध प्रशासन व शासनाव्दारे या कामी नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्याद्वारा (नोडल अधिकारी) राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.

 

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत सर्वोपरीने पर्यत्न केले जात आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी 21 एप्रिल 2021 ते 09 मे 2021 या कालावधीसाठी एकूण 8,09,000 एवढा कोटा मंजूर केलेला असून, येत्या काही दिवसात राज्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक उपलब्ध होणार आहे.

 

रेमडेसिवीर या इंजेक्शनाचे उत्पादन मे. सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या सात औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. या औषधाचा पुरवठा प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून करण्यात येतो. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या सात कंपन्यांना महाराष्ट्र राज्यासाठी 4,73,500 रेमडेसिवीरचा साठा 21 एप्रिल 2021 ते 02 मे 2021 या कालावधीत उपलब्ध करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार 30 एप्रिलपर्यंत 3,44,494 इतका साठा शासकीय व खासगी रुग्णालयांना वितरीत झाला आहे,अशी माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

 

 

 


Tags: rajendra shinganeडॉ. राजेंद्र शिंगणेनागपूरपुणेरेमडेसिवीर इंजेक्शन
Previous Post

“देशाला कोरोनाच्या खाईत ढकलून निवडणुका जिंकायला निघालेल्या भाजपला जनतेने धडा शिकवला”: नाना पटोले

Next Post

आज ५६ हजार नवे रुग्ण, ५१ हजार रुग्ण बरे, प. महाराष्ट्र, विदर्भ परिस्थिती गंभीरच!

Next Post
MCR 1-5-21

आज ५६ हजार नवे रुग्ण, ५१ हजार रुग्ण बरे, प. महाराष्ट्र, विदर्भ परिस्थिती गंभीरच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!