मुक्तपीठ टीम
शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये पाणीपुरीवरून भांडण झाले तर त्यांना काय शिक्षा होऊ शकते? फार तर ओणवा करणे, छडी मारणे, तेही नसावे असे म्हटले जाते. पण एका मुख्याध्यापकांनी पाणीपुरीवरून भांडल्यामुळे एका विद्यार्थ्याला केलेली शिक्षा ही अमानुष म्हणावी अशी प्राणघातक ठरु शकणारी होती. कुणीतरी मोबाइलवर फोटो काढल्याने ते उघडकीस आले. त्यांनी त्या मुलाचा एक पाय पकडून त्याला शाळेच्या गॅलरीतून हवेत लटकवले. साऱ्यांचेच श्वास रोखले गेले होते.
बुधवारी काढलेला हा फोटो गुरुवारी सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागला. त्यामुळे संतारप व्यक्त होऊ लागला. शाळेच्या मुख्याध्यापकाने एका लहान मुलाला हवेत उलटे टांगल्याचे फोटोत स्पष्ट दिसत आहे. हा क्षण कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला. शिस्तीचा हा धडा लोकांमध्ये संताप वाढवणारा ठरला. कारण हात सुटला असता तर मुलगा जीवास मुकला असता.
ही घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील नर्सरीच्या वर्गातील आहे. मुलांनी काही मुद्द्यावरून एकमेकांशी भांडण केले होते, त्यानंतर मुख्याध्यापक संतापले आणि मुलाला शाळेच्या अंगणाच्या बाल्कनीतून पायावर उलटे टांगले. त्यांचा शिस्तीचा धडा अंगाशी आला.
लोकांनी शाळेच्या मुख्याध्यापकावर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. प्रकरण जोर धरून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. त्यांनीही नाराजी व्यक्त करत गुन्हा नोंदवून योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले. पीडित मुलाचे वडील सोनू यादवचे वडील रणजीत यादव यांनी अहरौरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आयपीसी कलम ३५२ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आता पोलीस ठाण्यात आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
हा प्रकार जिल्ह्यातील अहरौरा येथील सद्भावना शिक्षण संस्था ज्युनिअर हायस्कूलचा आहे. पोलीस अधिकाऱ्याचा म्हणण्यानुसार, चौकशीत आरोपी मुख्याध्यापकाने स्पष्ट केले की, तो मुलगा खूप मस्ती करत होता. जेव्हा त्यांनी इतर मुलांना चावताना पाहिले तेव्हा त्यांनी त्याला अशी शिक्षा केली. एवढच नव्हे तर मी आपल्या मुलालाही अशी शिक्षा देतो.