मुक्तपीठ टीम
जपानचा सध्याचा राजा नारुहितोचा भाऊ प्रिन्स अकिशिनोची मुलगी राजकुमारी माको ही आहे. या राजकुमारीचे वय २९ वर्ष आहे. माकोने कोमूर या सामान्य मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोमूर आणि माको एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नापेक्षा विशेष आहे ते या राजकुमारीनं पुढचं जीवन सामान्यांसारखं जगण्यासाठी केलेला राजघराण्याचा त्याग! तसंच सोडलेली कोट्यवधीची नुकसानभरपाई!!
राजकुमारीचा राजघराण्याचा त्याग
- जपानच्या अकिशिनोच्या राजकुमारी माकोने सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगायचे ठरवले आहे.
- २९ वर्षीय राजकुमारी माको ही जपानचा सध्याचा राजा नारुहितोचा भाऊ प्रिन्स अकिशिनोची मुलगी आहे.
- तीने एका सामान्य नागरिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- माकोने कोमूरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- ती एका सामान्य नागरिकाच्या प्रेमात पडली आहे, ती त्याच्याशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक होणार आहे. • राज्यभरात घराण्याकडून मिळणारी नुकसान भरपाई घेण्यास तिने नकार दिला आहे.
- ९.१० कोटी रुपयांचे (१३.७० कोटी येन) नुकसान भरपाई नाकारली आहे.
कोमूर आणि माको एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, माको हे लग्न कधी करणार याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. पण असे म्हटले जात आहे की लग्नानंतर माको अमेरिकेत स्थायिक होणार आहे. माकोच्या या निर्णयाशी राजघराण्याचा संबंध आहे. त्यांचा या लग्नाला विरोध नाही.
राजकुमारी ‘प्रिन्स ऑफ द सी’ च्या प्रेमात
- राजकुमारीचा प्रियकर कोमुरो अमेरिकेत कायद्याचे शिक्षण घेत आहे.
- समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाला चालना देण्यासाठी तो ‘प्रिन्स ऑफ द सी’ म्हणून काम करतो.
- याशिवाय त्याला व्हायोलिन वाजवण्याचा छंद आहे. •त्याला स्वयंपाकाचीही आवड आहे.
राजकुमारी माकोने प्रसारमाध्यमांना सांगितले की, सन्मानाचे जीवन जगण्यासाठी विवाह हा एक आवश्यक पर्याय आहे. आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाही. कठीण प्रसंगी आम्ही एकमेकांना साथ देतो. माकोने २०१७ मध्येच विवाहाची घोषणा केली होती की ती २०१८ मध्ये लग्न करेल. पण नंतर ते २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आले. माको ने आतापर्यंत तिच्यासाठी आलेल्या सर्व स्थळांना नकार दिला आहे
केई कोमुरोने डिसेंबर २०१३ मध्ये डिनर दरम्यान राजकुमारी माकोला लग्नासाठी प्रपोज केले. दोघांनीही आपले प्रेम बराच काळ लपवून ठेवले होते. त्यानंतर राजकुमारी ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेली. पण आता हे दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.