Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

वडनगर ते दिल्ली व्हाया देशभर…संघ ते सत्तेपर्यंतची पंतप्रधान नरेंद्र मोदींची जीवनयात्रा!

September 17, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Prime Minister Modi's Birthday

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी आज जे काही आहेत त्यामागे अथक परिश्रम आणि संघर्ष आहे. नरेंद्र मोदींच्या जीवनाचा प्रवास गुजरात राज्यातील वडनगरपासून सुरू झाला. नरेंद्रभाई दामोदरदास मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी दामोदरदास मोदी आणि हीराबेन यांच्या घरी झाला. मग त्यावेळी कोणास ठाऊक होते की अत्यंत साध्या गुजराती कुटुंबात जन्मलेला एक लहान मुलगा एक दिवस देशाचा पंतप्रधान होणार होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बालपण आणि बरच काही…

  • नरेंद्र मोदी यांचे बालपण खूप गरिबी आणि संकटात गेले.
  • वडनगरमध्ये मोदी ज्या घरात राहत होते ते घर खूपच लहान होते.
  • नरेंद्र मोदी हे त्यांच्या आई-वडील आणि भावंडांसोबत दीड खोलीच्या घरात राहत होते.

आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांसोबत चहाही विकायचे

  • नरेंद्र मोदी ६ वर्षांचे असताना त्यांच्यासमोर पैसा कमावण्याची जबाबदारी आली होती.
  • तरुण वयात ते वडनगर रेल्वे स्टेशनवर वडिलांसोबत चहा विकायचे.
  • नरेंद्र मोदींच्या वडिलांचे स्टेशनवर छोटेसे दुकान होते. आजही ते दुकान वडनगर स्थानकात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संघर्षाची कहाणी

नरेंद्र मोदी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. ते आरएसएसमध्ये सामील झाल्या त्यावेळी त्यांचे वय ८ वर्षे होते. १९५८मध्ये, प्रचारक लक्ष्मण राव इनामदार यांनी नरेंद्रभाई मोदींना बाल स्वयंसेवक म्हणून शपथ दिली. तेव्हापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये जाऊ लागले. नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक शिक्षण वडनगर येथे झाले. आरएसएसमध्ये प्रचारक असताना त्यांनी १९८०मध्ये गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्रात एमएची पदवी घेतली. ६ मुलांपैकी ते तिसरे आहेत. मोदींना अभ्यासात विशेष रस नव्हता, पण त्यांना वादविवाद आणि नाटक स्पर्धांमध्ये खूप रस होता. त्यांना राजकारणातही खूप रस होता. मोदी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेशी जोडले गेले आणि भ्रष्टाचारविरोधी नवनिर्माण चळवळीतही भाग घेतला.

नरेंद्र मोदी यांचे वयाच्या १३व्या वर्षी लग्न.. १७व्या वर्षी सोडले होते घर

  • नरेंद्र मोदी यांची वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी जशोदाबेन चमनलाल यांच्याशी लग्न झाले आणि त्यांचे लग्न झाले तेव्हा ते केवळ १३ वर्षांचे होते.
  • मोदींनी जशोदाबेनशी लग्न केले असेल, पण ते कधीच एकत्र राहिले नाहीत. वयाच्या १७व्या वर्षी मोदींनी घर सोडले.
  • त्यावेळी ते कुटुंबीयांना न सांगता घरातून निघून गेले आणि त्यानंतर दोन वर्षे घरी परतले नाहीत. तेव्हा त्यांनी भारताचा दौरा केला. देशातील धार्मिक केंद्रांनाही त्यांनी भेटी दिल्या.
  • १९६९ किंवा १९७० मध्ये नरेंद्र मोदी गुजरातमध्ये परतले. त्यानंतर १९७१ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता बनले.

इंदिरा गांधींच्या कार्यकाळात १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यावेळी नरेंद्र मोदी हेही आघाडीच्या नेत्यांमध्ये होते.

१९८५मध्ये मोदींचा भाजपात प्रवेश… संघ ते सत्तेपर्यंतची जीवनयात्रा

  • १९७१ मध्ये पूर्णवेळ आरएसएस कार्यकर्ता झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी देशभर प्रवास केला आणि १४ वर्षे आरएसएससाठी काम केले.
  • राजकारणात येण्यापूर्वी मोदी हे संघाचे प्रचारक होते. त्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
  • नरेंद्र मोदी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सलग १४ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिले.
  • त्यांनी गुजरातचा समावेश देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये केला. आजही मोदींच्या गुजरात मॉडेलची चर्चा होते.
  • मोदी २२ मे २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते.
  • भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नरेंद्र मोदींनी अनेक पदांवर काम केले. १९८८-८९ मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात युनिटचे सरचिटणीस बनवण्यात आले.
  • माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ-अयोध्या रथयात्रा काढली, त्यावेळी नरेंद्र मोदींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हापासून मोदी हे बड्या नेत्यांमध्ये ओळखले जाऊ लागले.
  • २००१ हे वर्ष मोदींसाठी टर्निंग पॉइंट ठरले.
  • आघाडीच्या राज्यांमध्ये गुजरातचा समावेश करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या नरेंद्र मोदींना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार केले.
  • त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दणदणीत विजय नोंदवला आणि केंद्रात बहुमताचे सरकार स्थापन केले.
  • २०१४ मध्ये नरेंद्र मोदी देशाचे १४ वे पंतप्रधान बनले. त्यानंतर २०१९ मध्येही त्यांनी दणदणीत विजय मिळवला आणि बहुमताने केंद्रात पुन्हा पंतप्रधान बनले.

Tags: GujaratmuktpeethPrime Minister Modi's BirthdayPrime Minister Narendra Modi's Journeyगुजरातघडलं-बिघडलंपंतप्रधान नरेंद्र मोदी जीवनयात्रापंतप्रधान मोदी वाढदिवसमुक्तपीठ
Previous Post

मुसळधार पाऊस झाला पण ठाणे तुंबले, मुंबई नाही! असं का? मुख्यमंत्री काय म्हणाले?

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे लोकप्रिय योजना…एक नाही अनेक! वाचा काही महत्वाच्या योजना…

Next Post
Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे लोकप्रिय योजना...एक नाही अनेक! वाचा काही महत्वाच्या योजना...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!