Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रपती निवडणूक : शिवसेना – भाजपा एकत्र येणार?

June 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
PM modi Sanjay raut mamta Banerjee

मुक्तपीठ टीम

येत्या २० जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहेत. या निमित्ताने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाची एकजूट करून भाजपाविरोधात एकच उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर भाजपाही बिजू जनता दल, जनता दल युनायटेड, वायएसआर काँग्रेस या पक्षांच्या संपर्कात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठवरण्यासाठी शिवसेनेचा भाजपाशी संवाद होऊ शकतो.

भाजपासाठी शिवसेनेची दारे सदैव खुली आहेत, असं विधानही संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचाही संदर्भ आहे. मुंबईतील मोदींच्या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती, त्यांचं भाषण, पंतप्रधान आणि त्यांची देहबोली यातून दोन पक्षांमधील टोकाचा तणाव काहीसा निवळलेला जाणवल्याचं, राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत पाठिंब्यासाठी दारं किलकिली करून शिवसेना सकारात्मक संकेत देत असल्याचं मानलं जातं. याचा अर्थ लगेच राज्याच्या राजकारणातील सध्याची समीकरणे बदलणार, असं नसून दोन जुन्या मित्रांमधील कमालीची कटुता निवळण्याची सुरुवात होऊ शकते, असं असावं.

शिवसेना हा राष्ट्रीय बाण्याचा पक्ष!

  • शिवसेना नेते संजय राऊत अयोध्येत आहेत.
  • त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे मोठं विधान केलं.
  • चर्चेची दारे कधीच शिवसेनेने बंद केली नाही.
  • जेव्हा राष्ट्रीय विचार, मुद्दे असतात त्यावेळी शिवसेना नेहमीच सहकार्य करते.
  • शिवसेना हा राष्ट्रीय बाण्याचा पक्ष आहे.
  • कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नावर उद्धव ठाकरे हे कधीच दरवाजे बंद करून बसले नाहीत.
  • राष्ट्रीय भूमिकांवर त्यांनी नेहमी दरवाजे उघडे ठेवले आहेत.
  • तुमचा प्रश्न राजकीय आहे.
  • पण राष्ट्रीय प्रश्न असेल तर उद्धव ठाकरे कधीही खालच्या पातळीचं राजकारण करत नाहीत.
  • आमची भूमिका देशाला उत्तम नेतृत्व आणि दिशा मिळावी अशीच आहे.
  • म्हणून राहुल गांधींची चौकशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे.
  • हा राजकीय दबावाचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणी पुढाकार घेऊ नये म्हणून अशा प्रकारची कारवाई सुरू आहे.
  • २०२४ च्या निवडणुकीची ही तयारी सुरू आहे.

राजनाथ सिंह यांची विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा!

  • एकीकडे राष्ट्रपतीपदासाठी भाजपा उमेदवार ठरवत असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
  • दुसरीकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधकांची बैठक आयोजित केली होती.
  • या बैठकीला १७ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.
  • या बैठकीनंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही भाजपेतर पक्षांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
  • राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांची बैठक संपल्यानंतर ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा केली.

Tags: BJPPresident Electionsanjay rautShivsenaभाजपाराष्ट्रपती निवडणूकशिवसेना
Previous Post

सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा पात्रतेची अधिसूचना जारी

Next Post

सदाभाऊ खोत आमदारकी जाऊनही का फडणवीसांसाठी आक्रमक? समजून घ्या कारणं…

Next Post
Devendra And Sadabhau khot

सदाभाऊ खोत आमदारकी जाऊनही का फडणवीसांसाठी आक्रमक? समजून घ्या कारणं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!