Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोनाविरोधात सज्जता

February 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
corona rules

मुक्तपीठ टीम

कोरोना रोखण्यासाठी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांनी कंबर कसली आहे. पाचही जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेनं काटेकोरपणे कोरोना नियमावलीचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. तराही काही ठिकाणी लोकांकडून सुरक्षा नियमावलीचे उल्लंघन होत आहे. त्या ठिकाणी कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश काढले आहेत.यामध्ये हॉल,लॉन्स, मंगल कार्यालय तसेच इतर अन्य ठिकाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करतांना उपस्थितांच्यामर्यादेचे बंधन घातले आहे. तसेच समारंभाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षिततेच्या नियमांचे काटकोर पालन करणे आवश्यक आहे. पोलीस, प्रशासकीय प्रमुखांनी केलेल्या कार्यवाईचा अहवाल तत्काळ आपत्कालीन कक्षास सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात  कोरोना केअर सेंटरची  तपासणी  व आवश्यक साहित्याची  स्थिती तपासणीचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. लग्न संमारभाच्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून येणार नाही याची दक्षता घेणे. तसेच शाळा, महाविद्यालय, सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी कोरोनाच्या नियमांचे पालन करता आहेत की नाही याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत.

धूळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी मास्कचा वापर न करणाऱ्यांना 200 रुपये दंड,डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरची तपासणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहे.

तसेच खासगी डॉक्टरांकडून नियमितपणे घेणार आढावा घेण्यात यावा. गृह विलगीकरण, अलगीकरणातील रुग्णांची तपासणी करण्यात येणार. बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 व्यक्तींची चाचणी करावी. विवाह सोहळ्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक असून सर्व हॉटेल सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंतच राहणार सुरू राहणार.दुकानात एकावेळी मिळणार पाच ग्राहकांनाच प्रवेश, प्रवासी वाहनांतील संख्येवर निर्बंध तसेच सार्वजनिक उद्याने पहाटे 5 सकाळी ते 9 पर्यंतच खुली राहणार असल्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी एका आदेशान्वये जाहिर केले आहे.

जळगांव जिल्ह्यात लग्न समारंभात एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास कारवाई होणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी विना मास्क आढळल्यास  500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. रुग्णसंख्या वाढल्यास शाळांबाबतही निर्णय घेण्यात येईल असेही राऊत यांनी सांगितले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात उपहार गृहे, हॉटेल, रेस्टाँरंट व तत्सम ठिकाणे इत्यादी ठिकाणी 50 टक्के क्षमतेसह सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहतील. खाजगी कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्रे येथे कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरची तपासणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दकण्यात आले आहे. भाजी मार्केट, शॉपिंग कॉम्लेक्स, मॉल या ठिकाणी एकावेळी केवळ 5 ग्राहक उपस्थित राहतील. याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.


Tags: कोरोनाकोरोना केअर सेंटरनाशिकसूरज मांढरेसॅनिटायझर
Previous Post

“शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ देऊ!”- नाना पटोले

Next Post

शिवजयंती निमित्त पवईत शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आंदोलन

Next Post
शिवजयंती

शिवजयंती निमित्त पवईत शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!