रोहिणी ठोंबरे
रोहिणी ठोंबरे या मुक्तपीठ टीममधील पत्रकार आहेत. पत्रकारितेच्या धकाधकीतही त्या कवितेची आवड जोपासतात.
प्रेम म्हणजे काय असतं?
प्रेम म्हणजे काय असतं?
तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना
प्रेम फक्त मुला मुलीत नसून,
जीवनातील प्रत्येक व्यक्तींशी असते
जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा,
आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू म्हणजे प्रेम
नवरा बायकोमध्ये छोट्या-छोट्या कुरबुरी होऊनही,
दोघं एकमेकांना समजून घेणारं ते प्रेम
आपल्या आवडत्या व्यक्तीशी जुळवून घेवून,
मनमोकळेपणाने बोलणे ते प्रेम
जग, जीवन प्रेमानेच बनलं आहे,
त्यामुळे सर्वजन एकत्र आले आहेत
प्रेमाची भाषा सांगणं म्हणजे वेड लागेल
कारण प्रत्येकाच्या मनात प्रेमाच्या भाषा वेगवेगळ्या,
आनंदाने प्रेमाने जो जीवन जगतो,
त्यालाच या शब्दाचे महत्व माहिती असतं