मुक्तपीठ टीम
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून अनेकांना आपला जीव गमावा लागला. या कोरोना काळात नागरिकांनी नियम पाळावे, यासाठी पोलीस दल अहोरात्र झटत आहेत. पोलीस डोळ्यात तेल घालत त्यांचे कर्तव्य बजावित आहेत. त्यात आता छत्तीसगडमधील गर्भवती महिला उपायुक्तांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गर्भवती असताना देखील त्या पोलीस उपयुक्त कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकांना शिस्त लावण्याचे आपले कर्तव्य पार पाडत आहे.
कोण आहे गर्भवती महिला डीएसपी?
- हा व्हिडीओ बस्तर जिल्ह्यातील दंतेवाडाचा आहे.
- कोरोना संसर्गाने देशात थैमान घातले आहे.
- छत्तीसगडमध्येही कोरोना संसर्ग वेगानं पसरतो आहे
- व्हायरल व्हिडीओमध्ये असलेल्या महिला पोलीस उपायुक्तांचे नाव शिल्पा साहू आहे.
- कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी लोकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस सतत कार्यरत आहेत.
- व्हिडीओमध्ये, त्यांनी एका हातात काठी पकडली आहे आणि कोरोनापासून बचावासाठी मास्क लावला आहे.
- उपायुक्त शिल्पा साहू लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहे.
छत्तीसगडचे अतिरिक्त परिवहन आयुक्त दीपांशु काबरा यांनी ट्विटमध्ये डीएसपीचा फोटो शेअर करताना म्हणाले की, ” हे छायाचित्र दंतेवाडा डीएसपी शिल्पा साहू यांचे आहे. शिल्पा गरोदर असतानाही कडक उन्हात आपल्या टीमसह तैनात आहेत. त्या लोकांना घरी राहण्याचे आवाहन करत आहेत.
महिला उपायुक्त गरोदर असतानाही कोरोना संकटातही रस्त्यावर उतरून ड्युटी करणे म्हणजे धोकाच पत्करणे. त्यामुळे त्यांचा रस्त्यावर ड्युटी करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांना सलाम करणार्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचवेळी बर्याच लोकांनी तिच्या आरोग्याबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे.
सनी तामोरी नावाच्या यूजरने सांगितले की, “आम्हाला अशा आश्वासक पोलीस अधिकाऱ्याचा अभिमान आहे. जय हिंद. ”
दुसरा यूजर रवी म्हणाला, “आपली जबाबदारी समजून घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो. जर सामान्य जनता शहाणी असेल तर ती नियमांचे पालन करेल. परंतु महिला डीएसपींनी देखील आपल्या मुलाची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे, माझ्या मते ही त्यांची सर्वात मोठी जबाबदारी आहे.”
काही यूजर्सनी गर्भवती डीएसपीच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली
आणखी एक डॉक्टर वर्षा वरवंदकर यांनी लिहिले की, “कर्तव्य ही एक मोठी गोष्ट आहे, परंतु या कडक उन्हात, कोरोनाचा काळ आहे, होणाऱ्या तिच्या मुलावर ती अन्याय करीत आहे, अगदी ते ही डोक्यावर छत्री न घेता, तसेच आणि असे आंधळे धाडस, छत्तीसगडमधील पोलीस दलात पोलीस कमी पडत आहेत का, सर? ”
दुसरीकडे, डॉक्टर चुनिका उनियाल म्हणाल्या, “गर्भवती महिलेला या प्रकारची ड्यूटी देऊ नका. #COVID19 महामारीमध्ये तिला आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी हे धोकादायक ठरू शकते. ”
पाहा व्हिडीओ: