Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“…म्हणाले होते राष्ट्रवादी शिवसेना फोडतेय, भाजपा ईडी मागे लावतेय…जुळवून घ्या!”

सरनाईकांची भीती ठरली खरी! वाचा त्यांचं 'ते' पत्र!

March 25, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Sarnaik letter to cm

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम

ईडीने केलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईनंतर आता शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र पुन्हा चर्चेत आले आहे. ईडीने गेल्या वर्षी जूनमध्ये कारवाई सुरु केल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला फोडून आपलं बळ वाढवत असल्याचा आरोप केला होता. तसाच मंत्रिमंडळातील काही मंत्री दिल्लीशी जुळवून घेत असल्याचा दावाही केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या हितासाठी भाजपाशी जुळवून घेण्यास सांगितले होते.

ईडीकडून प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३६ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. NSEL या घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. प्रताप सरनाईक हे व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांच्याविरोधात ईडीने २०२१मध्ये कारवाई सुरु केली आहे. ईडी छापेमारीमुळे अडचणीत आलेल्या प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २० जून २०२१ पत्र लिहिले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत अशा परिस्थितीत भाजपाशी जुळवून भाजपाशी जुळवून घ्यायला हवं असा बॉम्ब सरनाईक यांनी या पत्रातून टाकला होता. केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी राज्यातील काही मंत्र्यांची केंद्राशी हातमिळवणी सुरु आहे, असा आरोपही प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून केला आहे.

 

प्रताप सरनाईकांचं पत्र जसं आहे तसं:

दि. ९ जून २०२१

प्रति,
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
तथा शिवसेना पक्षप्रमुख.

महोदय,
आपण गेले दीड वर्ष राज्याची धुरा यशस्वी व समर्थपणे सांभाळत आहात. कोरोना सारख्या महासंकटाला आपण ज्या पद्धतीने तोंड दिले . या संकटाचा मुकाबला केला याबद्दल प्रत्येक जण आपल्या नेतृत्वाचे कौतुक करत आहे . महाराष्ट्राची जनताच नाही तर देशात विदेशातही ‘ महाराष्ट्र मॉडेल ‘ व आपल्या कार्यशैलीचे खूप कौतुक होत आहे . याचा आपले कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान आहे 86 कोरोना ” ला रोखण्यासाठी राज्यात आपण ज्या प्रभावी उपाययोजना केल्या त्याची दखल देशात – विदेशात घेतली गेली आहे . आपली अविरत मेहनत , दूरदृष्टी व एकूणच नियोजन यामुळे हे संकट कमी झाले . कोविडच्या पहिल्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर दुसरी लाट येणार हे अर्पक्षीत धरून त्याआधीच आरोग्य सुविधा आपण वाढवल्या . मोठमोठी कोविड सेंटर उभारलीत . प्रयोगशाळा , ऑक्सिजन प्लांट व इतर आरोग्य सुविधा पुरविण्यात महाराष्ट्र पुढे राहिला . कोरोनामुळे जनजीवन ठप्प व विस्कळीत झालेले असताना आपल्या महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे काम आपण सुरु ठेवले . नुकतेच जे चक्रीवादळ आले त्या वादळग्रस्तांचे आपण सांत्वन केले व स्वतः जाऊन त्यांना मदत पोहोचवली , आधार दिला . हे करीत असताना मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रोची कामे , उड्डाणपूल , कोस्टल रोड व इतर सर्वच मोठ्या कामांसाठी आपण चांगले प्रयत्न करीत आहेत , दिवसरात्र आपण कामात झोकून दिले आहे . मुंबईच्या पर्यावरण रक्षणासाठी ” आरे ” ची ८१२ एकर जमीन वनखात्याला मिळवून देत पर्यावरण रक्षण करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला . अनेक मोठे निर्णय आपण घेतले आहेत . आपले त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन साहेब !

मराठा व ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रश्नासंदर्भात ८ जून रोजी आपण नवी दिल्लीत पंतप्रधान श्री . नरेंद्र मोदीजी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्याबाबत पुढाकार घेतला त्याबद्दलही मनःपूर्वक अभिनंदन . त्या बैठकीनंतर आपण मा . मोदीजी यांच्यासोबत अर्धा तास खासगीत चर्चा केल्याचे वृत्त दाखवले जात आहे , त्यामुळे महाराष्ट्र राज्यात शिवसेना – भाजप तसेच सर्व पक्षीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत . दीड वर्षापूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना – भाजप महायुती म्हणून आपण एकत्र लढल्यानंतर अडीच – अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरून आपली युती तुटली . त्यानंतर काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना यांची महाविकास आघाडी तयार झाली व राज्यात सत्ता स्थापन झाली . या अभूतपूर्व परिस्थितीत शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद मिळवत आपली ताकद , नेतृत्वगुण , कणखरपणा , राजकीय दूरदृष्टी आपण भाजपला व राज्याला , देशाला दाखवून दिली . परंतु गेल्या दीड वर्षात कोरोना संकटाने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत . आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहात . त्याचमुळे देशातील ” सर्वोत्तम मुख्यमंत्री ” म्हणून आपण पहिल्या क्रमांकावर आहात .

एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात . तर दुसरीकडे काँग्रेस – राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला , असे काँग्रेस – राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे . त्यात काँग्रेस पक्ष ” एकला चलो रे ” ची भूमिका घेत आहे . तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते – कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते – कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे . तसेच महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करीत आहेत हेही आपल्या निदर्शनास आणून देत आहे.

त्याचबरोबर गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी मी चर्चा केल्यानंतर ” काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात , मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत ” अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी आहे . एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली . भाजपशी युती तोडून शिवसेना पक्षाने , काँग्रेस – राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ” महाविकास आघाडी ” स्थापन केली की काय ? अशी चर्चा आहे . साहेब , आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे . कोरोना काळात आपण प्रचंड मेहनत घेऊन कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचा संभाळ केला आहे . त्याबद्दल आपले खरोखर कौतुक करावे तितके कमी आहे . महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय श्री . बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे . आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात . पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल , आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्री . नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे , असे माझे वैयक्तिक मत आहे . निदान यामुळे प्रताप सरनाईक , अनिल परब , रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे . कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे ” माजी खासदार ” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाही कुठे तरी आळा बसेल . आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत , खोटे आरोप होत आहेत . एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे , त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत . आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल .

युद्धात लढत असताना अभिमन्यूसारखे लढण्यापेक्षा किंवा कर्णासारखे बलिदान देण्यापेक्षा , धनुर्धारी अर्जुनासारखे लढावे असे मला वाटते . त्यामुळे राज्यात आपली सत्ता असताना सुध्दा व राज्य शासनाचे किंवा इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळाले नसताना , कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेले ७ महिने लढत आहे . पुढील वर्षी मुंबई , ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत . आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध , जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे . ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल . तर त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल असे मला वाटते . साहेब , आपण योग्य तो निर्णय घ्यालच . माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत . लहान तोंडी मोठा घास घेतलाय , काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो .

धन्यवाद !

आपला स्नेहांकित

प्रताप सरनाईक

 

 

sarnailk-letter

 

“भाजपाशी जुळवून घ्या…” भूमिका व्यर्थ…शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांची मालमत्ता ईडीकडून जप्त!


Tags: BJPcm uddhav thackerayEDpratap sarnaikShivsenaईडीप्रताप सरनाईकभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

“भाजपाशी जुळवून घ्या…” भूमिका व्यर्थ…शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांची मालमत्ता ईडीकडून जप्त!

Next Post

दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक एकमताने मंजूर

Next Post
vidhan bhavan

दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक एकमताने मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!