मुक्तपीठ टीम
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमधील पराभवानंतर काँग्रेस आतापासूनच गुजरात विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीस लागली आहे. २०२२ च्या अखेरीस अपेक्षित गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर काँग्रेससाठी रणनीती तयार करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस गुजरात निवडणुकीसाठी पाटीदार समाजातील प्रभावशाली उद्योगपती नरेश पटेल यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून सादर करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, काँग्रेसचा मार्ग सोपा नाही. कारण अरविंद केजरीवालांचा आपही गुजरातमध्ये सक्रिय झाला असून नरेश पटेलांना आपलं करण्याच्या प्रयत्नात आहे.
या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आतापासूनच सर्व पक्ष सक्रिय झाली आहे. नरेश पटेल हे गुजरातमधील पाटीदार समाजातील प्रभावशाली उद्योगपती आहेत. गेल्या २८ वर्षांपासून गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता नाही. त्यामुळे काँग्रेस नरेश पटेल यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढवण्याची रणनीती आखत आहे.
प्रशांत किशोरांची रणनीती आणि नरेश पटेलांचं महत्व!
- काँग्रेससाठी प्रशांत किशोर रणनीती आखत आहेत.
- त्या रणनीतीनुसारच नरेश पटेल लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.
- नरेश पटेल हे पाटीदार नेते आणि खोडलधाम ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
- हा ट्रस्ट खोडलधाम माता मंदिराचा कारभार पाहतो, जी लेउवा पटेलांची कुलदेवता आहे.
- नरेश पटेल हे त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पाटीदार समाजात प्रभावशाली नाव मानलं जातं.
- त्यांचा प्रभाव इतर मतदारांवरही आहे.
नरेश पटेलांच्या हातात हात की झाडू ?
- नरेश पटेल यांनी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेतली आहे आणि एप्रिलमध्ये राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्यादरम्यान ते काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात.
- नरेश पटेल यांना आम आदमी पक्षसुद्धा त्यांना बोलवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.