Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कपटी राजकारणी + नकली पत्रकार + सुट्टीवरील न्यायव्यवस्था + नाकर्ते प्रशासन + बेशिस्त जनता = कोरोना अनागोंदी

April 24, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
prafull wankhede

प्रफुल्ल वानखेडे

 

गेले १५ दिवस झाले सोशलमिडीया असो, टिव्ही, पेपर वा घरातली चर्चा असो कोरोनामुळे वेड लागायची पाळी आलीये इतक्या विचित्र थराला जाऊन पोहचलीये. सरकारी अनागोंदी, राजकारणातील कुरघोडीच्या विकृती, कपटी राजकारणी, त्यांना साथ देणारे नकली पत्रकार, सुट्टीवरील न्यायव्यवस्था आणि नाकर्ते प्रशासन याला जेवढे कारणीभूत आहेत तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त आपली “बेशिस्त” जनता याला कारणीभूत आहे. (या प्रत्येकात अगदी काही अपवाद आहेत, त्यांची मी क्षमा मागतो) पण वस्तुस्थिती ही आहे की प्रत्येक क्षेत्रात, ऊद्योग असो, खाजगी वा सरकारी नोकरी असो वा घरगुती वा लघु ऊद्योग असो आपल्याला नियम आणि कायदे वाकवायची, मोडायची भितीच वाटत नाही, आणिबाणीच्या, महामारीच्या काळातही कोणी कायद्याला किंमत देईना.

 

एकंदर अघळपघळपणा आणि “चलता है” ॲटिट्यूड आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलाय. पत्रकार, पोलिस आणि न्यायव्यवस्था ही याच मुळे तर भ्रष्ट होत चाललीये. आजच्या एकविसाव्या शतकातही आपल्या देशाचा विज्ञानापेक्षा इतिहास आणि इतर नको त्या गोष्टींवरचा विश्वास दृढ होत चाललाय. तार्कीक आणि सांख्यिकीचे गणित जाणणारे जगभरातील तत्वज्ञ, आरोग्यविषयक शास्त्रज्ञ महामारीच्या दुसऱ्या लाटेबद्दल बोलत असताना आपल्याकडे ॲाक्टोबरपासूनच सर्व सूरळीत झाल्याच्या थाटात कार्यक्रम सुरू झाले.

 

सर्वात मोठा विनोद म्हणजे यात राजकारण्यापेक्षा शिकले सवरले लोक बेफाम होऊन सगळीकडे सहकुटुंब फिरत होते. मग यात बिनडोक राजकारणी कसे मागे राहतील तेही हिरहिरीने सामिल झाले. लस, औषधे, आरोग्य व्यवस्थेची उभारणी, डॅाक्टर, नर्सेस, इतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, सोईसुविधा सर्वांचा विसर पडला. आणि वर्षभरानंतर एका भयंकर दुस्वप्नाच्या आगडोंबात हा देश बुडाला.

 

माझ्या मते कोरोना रोगापेक्षा पेक्षा जास्त बळी हे आपली एकंदर व्यवस्था गहाळ राहिल्याने, दुसऱ्या लाटेची कोणतीही पुर्वतयारी न केल्याने आणि नियोजनशुन्य कारभारामुळे पडलेत. सर्वाधिक निरपराध जीवांच्या मृत्यूचे कारण हे ही अव्यवस्थेतच आहे. निवडणुका, लग्नसमांरभ, जत्रा, विविध कार्यक्रम यातील बेशिस्त आणि कायदे मोडण्याच्या उपजत स्वभावामुळेही कित्येक निरपराध, निष्पांपांचा यात जीव गेलाय. या कोरोना व्हायरसपेक्षा आपल्यातील हे दुर्गुण आपल्या देशाला, राज्याला आणि कुटुंबाला जास्त धोकादायक आहेत…

 

जगभरातील शास्त्रज्ञ ओरडून सांगत असताना आपले देश अन राज्य पातळीवरील सर्वोच्च नेतेच जर विना मास्कचे फिरत असतील तर आपली जनता कशाला कायदे मानेल? या भयंकर महामारीतून आपल्या देशाला आणि राज्याला काय शिकायचे असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणे, स्वत:ची आणि कुटूंबाची सुरक्षा आणि कामाची शिस्तबद्ध पद्धत! मला वैयक्तिकरित्या वाटते की ही महामारी सरकार पेक्षा आपण सर्वांनी मिळून ओढवून घेतलीये…. खर तर हे एक कटू सत्य आहे की – “We are getting what we all deserve!”

 

लायकीप्रमाणे हा कोरोना आपल्या देशाला छळतोय. मंडळी, आपण स्वत:च आपल्यासोबत इतर सर्वांनाच स्मशानाकडे ढकलतोय….
निदान आता तरी जागे होऊ, शिस्त, कायदे, नियम पाळू…. इतरांनाही ते पाळायला लावू….
कोरोनाला टाळण्याचा सध्या तरी दुसरा कोणताच उपाय नाही. चला, मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, लवकरात लवकर लस घेण्यासाठी प्रयत्न करा, राजकारणी काहीही म्हणो, जात, धर्म, विसरून एकमेकांना मदत करा!
स्वत:ची आणि कुटूंबाची काळजी घ्या, सुरक्षित रहा!

wankhedeprafull

(प्रफुल्ल वानखेडे हे स्वबळावर शून्यातून शिखर गाठणारे उद्योजक. नाविन्यपूर्ण कल्पनांनी सळसळणारे, सतत सक्रिय राहणारे आणि त्यातूनच वाचन प्रचार-प्रसाराचं व्रत घेतलेले वाचनप्रेमी. मराठी माणसांना उद्यमशील बनवण्यासाठी त्यांचे सल्ले मोलाचे असतात. सामाजिक घडामोडींवर संवेदनशीलतेनं ते भाष्य करतात.)
ट्विटर @wankhedeprafull

 

 


Tags: coronamuktpeethPrafull wankhedeकोरोनाकोरोना अनागोंदीव्हा अभिव्यक्त
Previous Post

खावटी अनुदान योजना आदिवासी कुटुंबापर्यंत पोहचवण्याचे आवाहन

Next Post

राज्यात रेमडेसिविरचा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

Next Post
remdesivir

राज्यात रेमडेसिविरचा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!