Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मुंबईत ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव,’ १४ जानेवारीला पुरस्कार वितरण!

January 12, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Prabodhan International Short Film Festival announced by president Subhash Desai with Ashok Rane (1)

मुक्तपीठ टीम

१९७२ साली स्थापना झालेल्या आणि मुंबई व महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, खेळ आदी क्षेत्रात जाणीवतेने कार्य करणार्‍या ‘प्रबोधन गोरेगाव’ संस्थेद्वारे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त “प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा”चे आयोजन महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

 

लघुपट करणार्‍या करू इच्छिणार्‍या जगभरातील मराठी कलावंतांसाठी एक भरभक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन लघुपटांच्या निर्मितीसोबत त्यांचे मार्केटिंग आणि विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत सहभाग घेण्यातील मार्गदर्शनही देण्यात येणार आहे. प्रख्यात जागतिक कीर्तीचे चित्रपट अभ्यासक, समीक्षक व दिग्दर्शक अशोक राणे हे या ‘महोत्सव संचालक’ म्हणून कार्यभार पहात आहेत तर मंगेश मर्ढेकर यांनी या महोत्सवाच्या ‘कार्यक्रम संचालक’पदी योगदान दिले आहे.

 

महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दि. १४ जानेवारी २०२२ रोजी पु. ल. देश्पांडे कला अकादमी, दादर, मुंबई येथे या वेळेत संपन्न होणार असून या सोहळ्यास लोकप्रिय अभिनेते संदीप कुलकर्णी  प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यासोबतच चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणार्‍या गोदावरी या मराठी चित्रपटाचे अभिनेते जितेंद्र जोशी व दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष सन्मान व गौरव या समारंभात करण्यात येण्यात आहे. महोत्सवाचा समारोप समारंभ सायंकाळी ५ : ३० वा. ते ६ : ३० वा. या वेळेत संपन्न होणार असून केवळ निमंत्रितासाठी प्रवेश दिला जाणार आहे. जगभरातील प्रेक्षकांना हा समारंभ संस्थेच्या अधिकृत https://www.facebook.com/prabodhanisff या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे.

 

या महोत्सवासाठी ७० हून अधिक मराठी लघुपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.  त्यामधून निवड समितीने दक्षतेने १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे.

 

अधिकृत निवड झालेले चित्रपट:

  1. अंकुर / दिग्दर्शक: महादेव आनंदराव धुलधर / २७ मि. ३७ से.
  2. अर्जुन / दिग्दर्शक: शिवराज वाईचळ / १४ मि. ४५ से.
  3. बटर चिकन / दिग्दर्शक: मयुरेश वेंगुर्लेकर / १८ मि. १४ से.
  4. फक्त १४४ / दिग्दर्शक: अशोक यादव / १२ मि. ५५ से.
  5. खिसा / दिग्दर्शक: राज मोरे / १५ मि. ५६ से.
  6. लगाम / दिग्दर्शक: मदन काळे / २० मि.
  7. लाल / दिग्दर्शक: सुमीत पाटिल / २६ मि. ३३ से.
  8. वन्स ही डिड अ टीनएज पेंटिंग / दिग्दर्शक: ओमकार दामले / २० मि. ०२ से.
  9. प्रयोग / दिग्दर्शक: पुष्पक जळगावकर / २४ मि. ३१ से.
  10. राजा / दिग्दर्शक: संतोष बांदेकर / १७ मि. १४ से.
  11. सप्पर / दिग्दर्शक: अमोल साळवे / १६ मि. १२ से.
  12. साईड मिरर / दिग्दर्शक: विराज झुंजारराव / २६ मि. ५० से.
  13. ताजमहाल / दिग्दर्शक: प्रविण खाडे / १० मि. ५४ से.
  14. द कॉईन / दिग्दर्शक: रुपेश वेदे / ११ मि. ३६ से.
  15. विकट / दिग्दर्शक: देवदत्त मांजरेकर / ०६ मि. ३० से.

 

या १५ लघुपटांमधून प्रथम निवडल्या जाणाऱ्या एकास सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळणार असून रु. ७५,०००/- रोख रक्कम व ट्रॉफी व प्रमाणपत्र बक्षिस देण्यात येईल. तसेच द्वितीय लघुपटाला रु. ५०,०००/- रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र आणि तृतीय लघुपटास रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

 

संपुर्ण पुरस्कारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे –

सर्वोत्कृष्ट लघुपट – प्रथम पुरस्कार

रु. ७५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

 

सर्वोत्कृष्ट लघुपट – द्वितीय पुरस्कार

रु. ५०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

 

सर्वोत्कृष्ट लघुपट – तृतीय पुरस्कार

रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

 

सर्वोत्कृष्ट अभिनेता

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

 

सर्वोत्कृष्ट पटकथालेखक

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

 

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

 

सर्वोत्कृष्ट बालकलाकार

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

 

सर्वोत्कृष्ट संकलक

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

 

सर्वोत्कृष्ट ध्वनि

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

याशिवाय अन्य विशेष पुरस्कारही महोत्सवाकडून देण्यात येणार आहेत –

 

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक महाराष्ट्र यापैकी एखाद्या विषयांवरील सर्वोत्कृष्ट लघुपट

(रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

 

मराठी साहित्यकृतीवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपट

(रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

 

फिल्म स्कूल किंवा मास मिडिया इन्स्टिट्यूट्समध्ये फिल्ममेकिंगचे प्रशिक्षण घेणार्‍या दिग्दर्शकांपैकी सर्वोत्कृष्ट लघुपट

(रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

 

मराठी नाट्यकृतीवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपट

(रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

 

महोत्सव व पुरस्कार वितरण समारंभ:

महोत्सवामधे निवडलेल्या १५ लघुपटांचे स्क्रीनिंग आणि त्यानंतर विजेत्यांना पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दि. १४ जानेवारी २०२२ रोजी मिनी थिएटर, पु. ल. देशपांडे अकादमी (दादर, मुंबई) येथे आयोजित करण्यात येत आहे. हा समारंभ सायंकाळी ५ : ३० वा. ते ६ : ३० वा. या वेळेत संपन्न होणार असून केवळ निमंत्रितासाठी प्रवेश दिला जाणार आहे. जगभरातील प्रेक्षकांना हा समारंभ संस्थेच्या अधिकृत https://www.facebook.com/prabodhanisff या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे. सध्याच्या कोविड-१९च्या परिस्थितीमधे या स्क्रीनिंग्स आणि समारंभ महाराष्ट्र राज्य शासन व मुंबई महानगरपालिकेच्या दिशानिर्देशांनुसार पार पडेल, याची कृपया नोंद घ्यावी.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: dadarPrabodhan International Short Film Festivalsubhash desaiदादरप्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवसुभाष देसाई
Previous Post

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण

Next Post

लष्कराच्या नाशिक आर्टिलरी सेंटरमध्ये भरती, १०वी, १२ वी उत्तीर्ण फ्रेशर्सना संधी

Next Post
indian army

लष्कराच्या नाशिक आर्टिलरी सेंटरमध्ये भरती, १०वी, १२ वी उत्तीर्ण फ्रेशर्सना संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!