संगीता पांढरे
जिथं अंधश्रद्धा तिथं अंनिस म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती लढण्यासाठी पोहचतेच पोहचते. धडत देतेच देते. त्याचवेळी जे लढवय्ये अंधश्रद्धा निर्मूलणाच्या या लढ्यात नेहमीच आघाडीवर असतात त्यांच्यापैकी एक नाव म्हणजे प्रभा पुरोहित यांचं. माझ्यासारख्या असंख्य नवतरुणांना कसलीही तमा न बाळगता अंधश्रद्धा निर्मूलणासाठी लढण्यासाठी त्या प्रेरणा देत असतात. त्यांचा उत्साह आमच्या तरुणाईलाही लाजायला लावणारा ऊर्जादायी असा असतो.
नव्वदीकडे झेपावणाऱ्या चिरतरुण, अतिशय उत्साही अशा प्रभा पुरोहित म्हणजे सळसळत्या भारत कन्याच. कन्या दिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय:
प्रभा पुरोहित या ८२ वर्षांच्या असून महाराष्ट्र अंनिसच्या २० वर्षापासून सक्रिय कार्यकर्ता आहेत. भवन्स महाविद्यालयात गणित विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी (मराठी, हिंदी आणि इंग्रजी) या 3 भाषांवर प्रभूत्व मिळवलेल आहे.
प्रभा पुरोहित यांच्या आयुष्याची पहिली १७ वर्षे वसईमधील खेड्यात गेली. त्यांचे आई-वडील शिक्षक असल्याने त्यांची जडणघडणही चांगली झाली. त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे.
साधं आणि सोप राहणीमान, बोलण्यात स्पष्ट आणि प्रखरता, वेगवेगळ्या विषयांच त्यांना ज्ञान आहे. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी आतापर्यंत वैज्ञानिक दृष्टीकोन, चमत्कार सादरीकरण, छद्मविज्ञान, स्त्रिया आणि अंधश्रद्धा, अशा वेगवेगळ्या विषयांवर समाजप्रबोधन केले आणि आताही त्यांच काम सूरू आहे. प्रबोधनाची गीते ही त्या सूरेल आवाजात गातात आणि ते इतर कार्यर्त्यांनाही प्रशिक्षण देतात.
त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने केलीत. जनजागृतेचे कार्यक्रम घेतले. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सोसायटी, आदिवासी पाडे, इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम घेतले आहेत. त्याचसोबत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही दिले आहे.
ते कार्यक्रम घेतांना एक मंत्र म्हणत “भूत भानामती करणी मूठ विज्ञान सांगते हे सर्व झूठ!”. प्रभा पूरोहित आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, ‘ Child is the father of the man ‘. म्हणजे आपले लहानपणीचे अनुभवच आपल्याला घडवत असतात. हे अगदी खरे आहे. आता जर माझ्या हातून काही चांगले घडत असेल तर त्याचे काही अंशी श्रेय या माझ्या बालपणाला जाते.
आता काही दिवसांपूर्वी त्यांनी संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे गावात वैज्ञानिक दृष्टिकोनावर एक कार्यक्रम घेतला होता. वयाच्या ८२व्या वर्षीचा त्यांचा हा उत्सव शतकोत्तरही असाचा सळसळता राहिल. माझ्यासारख्या तरुणांना त्या सतत, अथक, निरंतर कार्याची ऊर्जा आपल्या उक्ती आणि कृतीतून पुरवत राहतील.