Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधी अमेरिकेत बातमी, मग राज्याच्या गृहविभागाचा अहवाल!

मुंबईतील वीजपुरवठा खंडित प्रकरणी अखेर महाराष्ट्र सायबरचा अहवाल सादर

March 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
anil deshmukh

मुक्तपीठ टीम

गतवर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत वीजपुरवठा खंडित झाल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने केलेल्या तपासाचा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना सुपूर्त केला. खरंतर हा अहवाल आधीच सादर होणे आवश्यक होते. पण झाला नाही. माध्यमांमध्ये सुत्रांच्या आधारे आलेल्या बातम्यांचाही इंकार करण्यात आला. पण अमेरिकन माध्यमांमध्ये तेथील खासगी कंपनीच्या हवाल्याने बातम्या आल्यानंतर मात्र, सरकारी अहवाल सादर करण्यात आला आहे.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनॅलिसिस या अमेरिकन कंपनीने २८ फेब्रुवारी रोजी एक अहवाल जारी केला. या अहवालात त्यांनी असे म्हटले आहे की, मुंबईच्या ईलेक्ट्रीकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चीन मालवेअर (व्हायरस) टाकला असल्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची बातमी दि. १ मार्च रोजी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रातही तसेच वॉलस्ट्रीट जर्नल मध्येही प्रसिद्ध झाली आहे.

देशमुख म्हणाले की, मुंबईत वीजपुरवठा खंडित प्रकरणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या अधिक तपासाबाबत त्यावेळी विनंती केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला देण्यात आले होते.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले की, १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्याच्या प्रकरणी घातपाताच्या शक्यतेच्या दृष्टीकोनातून तपास करणे आवश्यक वाटल्याने गृहमंत्रीदेशमुख यांच्याकडे तपासाबाबत विनंती केली होती. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, ऊर्जा विभागाने याप्रकरणी गठित केलेल्या तांत्रिक तपास समिती आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाकडून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र सायबरचा अहवालही प्राप्त झाला आहे. विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे या अहवालांच्या अनुषंगाने अधिक माहिती विधानमंडळात सादर केली जाईल.

पत्रकार परिषदेला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महाराष्ट्र सायबरचे पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव आदी उपस्थित होते.


Tags: anil deshmukhEnergy Minister Dr. Nitin Rautगृहमंत्री अनिल देशमुखडॉ. नितीन राऊतवीजपुरवठा खंडितसचिव दिनेश वाघमारे
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) अभिनयातून हिरोपंती करून प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता टायगर श्रॉफचा आज ३१ वा वाढदिवस आहे. त्याला ‘मुक्तपीठ’च्या हार्दिक शुभेच्छा… २) अभिनेत्री आणि गायिका श्रद्धा कपूर हीने सध्या मालदीव मधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती तिच्या भावाच्या लग्नासाठी मालदीवला गेली आहे. तिच्या या व्हिडीओमुळे तीने चाहत्यांचे मन घायाळ केले आहे. यामुळे ती सध्या चर्चेत आहे. ३) वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक जण आता अभिनय क्षेत्रात उतरताना दिसतात. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्थ आहे. तो लवकरच ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ४) बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारेच आपल्यावर शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चाहत्यांना अमिताभ यांची काळजी होती. पण नुकतेच अमिताभ यांनी ब्लॉग पोस्ट करत डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला. त्यानंतर आता त्यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. ५) अभिनेता विकी कौशल आणि मिस वर्ल्ड म्हणजे मानुषी छिल्लर हे दोघे लवकरच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा एक विनोदी चित्रपट असल्याची माहिती मिळाली आहे. पण अजूनही या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही.

Next Post

#मुक्तपीठ मंगळवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ मंगळवारचे 'टॉप-१० व्हायरल बुलेटिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!