मुक्तपीठ टीम
एक जूनपासून देशात अनेक बदल होणार असून त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर आणि खिशावरही होणार आहे. त्यामुळे कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. तर जाणून घेऊयात काही बदल ज्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर होणार आहे.
चेक फसवणूक टाळण्यासाठी बँक ऑफ बडोदाचा नियम बदल
• बँक ऑफ बडोदाच्या या नियमामध्ये होणार बदल
• बँक ऑफ बडोदाने ग्राहकांसाठी १ जून २०२१ पासून पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन अनिवार्य केले आहे.
• ग्राहक फसवणुकीची शिकार होऊ नयेत हा यामागचा मानस आहे.
• पॉझिटिव्ह पे प्रणाली एक प्रकारे फ्रॉड शोधणारं टूल आहे.
• या सिस्टिम अंतर्गत ग्राहकांने चेक जारी केल्यानंतर बँकेला संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
• चेक पेमेंट करण्याआधी बँक ही माहिती क्रॉस चेक करेल.
• जर यामध्ये कोणताही फरक आढळून आल्यास बँक तो चेक रिजेक्ट करेल.
गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल होणार की नाही?
• देशाच्या सरकारी तेल कंपन्या महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती ठरवत असतात.
• त्यामुळे किंमती वाढण्याची शक्यता आहे.
• परंतु पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधातील संताप पाहता किंमती न वाढल्याने दिलासाही मिळू शकतो.
आयकर ई-फायलिंग पोर्टल बंद
• १ ते ६ जून दरम्यान आयकर विभागाचे ई-फायलिंग पोर्टल बंद राहणार आहेत.
• तर ७ जूनपासून आयकर विभाग आपल्या करदात्यांसाठी नवे पोर्टल लॉन्च करणार आहे.
• आयटीआर भरण्याची अधिकृत वेबसाइट ७ जून पासून बदलणार असून ती http://incometax.gov.in असणार आहे.