मुक्तपीठ टीम
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बरेच नियम बदलतात. ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक बजेटवर परिणाम होऊ शकतो. स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम, चेकशी संदर्भातील नियमात बदल होणार आहे. जुलैला फक्त एक आठवडा उरला आहे. जाणून घ्या १ जुलैपासून कोण-कोणत्या नियमांत बदल होणार आहेत.
१ जुलैपासून बदलणार या बँकेचे आयएफएससी कोड
- सिंडिकेट बँकेचे आयएफएससी कोड १ जुलै २०२१ पासून बदलणार आहे.
- सिंडिकेट बँकेने ग्राहकांना नवीन आयएफएससी कोड ३० जूनपर्यंत अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
- कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण झाले होते.
- नवीन आयएफएससी कोड जाणून घेण्यासाठी तुम्हाला कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर जावे लागेल.
एलपीजी सिलिंडरच्या किंमती
- तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात.
- अशा परिस्थितीत या वेळी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत काही वाढ झाली आहे की नाही हे पाहावे लागेल.
१ जुलैपासून टीडीएसला दुप्पट पैसे द्यावे लागतील
- आयकर विवरणपत्र न भरणाऱ्यांवर आयकर विभागाने कडक पावलं उचलली आहेत.
- तुम्ही अजूनपर्यंत इन्कम टॅक्स भरला नसेल, तर लवकर हे काम पूर्ण करा.
- अन्यथा जुलैपासून तुम्हाला दुप्पट टीडीएस भरावा लागेल.
- या कारणास्तव, प्राप्तिकर विभागाने आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलै ते ३० सप्टेंबर पर्यंत वाढविली आहे.
एसबीआयच्या नियमांतही बदल-
- भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या ग्राहकांसाठी १ जुलै २०२१ पासून बरेच नियम बदलणार आहेत.
- एटीएममधून १ जुलैपासून पैसे काढण्यासाठीचे नियम आणि चेकबुक जारी करण्याबाबतही नियमात बदल होत आहेत.
- एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) अकाउंट खातेधारकांना दर महिन्याला चार वेळा मोफत पैसे काढता येतात, ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे.
- मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर १५ रुपये अधिक जीएसटी आकारण्यात येणार आहे.
- एसबीआय बीएसबीडी खातेधारकांना एका फायनान्शिअल इयरमध्ये १० चेकची कॉपी मिळते. आता १० चेकच्या चेकबुकवर चार्जेस द्यावे लागतील. १० चेकच्या पानांसाठी बँक ४० रुपये आणि जीएसटी शुल्क आकारेल
- २५ चेक लीवसाठी बँक ७५ रुपये अधिक जीएसटी आकारेल.