Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जुलैपासून पावसाळी अधिवेशनाची तयारी, ४४५ खासदारांचे लसीकरण!

२१ जूनपासून खासदार, कर्मचाऱ्यांपैकी उरलेल्यांचे लसीकरण

June 29, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
par1

मुक्तपीठ टीम

जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संसदेचे पावसाळी अधिवेशन होईल. सर्व तयारी झाली आहे. आतापर्यंत ४४५ खासदारांना लस मिळाली आहे. सचिवालयातील सर्व कर्मचार्‍यांनाही लस देण्यात आली आहे. खासदार आणि संसदेत काम करणार्‍यांपैकी ज्यांना लस मिळाली नसेल, त्यांना २१ जूनपासून मिळणार आहे.

 

मंत्रिमंडळाची उपसमिती तारखा ठरवणार

  • अधिवेशनाचा निर्णय मंत्रिमंडळाची उपसमिती घेते.
  • लोकसभेच्या पावसाळी सत्राची तयारी सुरू आहे.
  • अधिवेशनात कोरोना मार्गदर्शक सूचना पाळल्या जातील.

 

संसदेत ४० हून अधिक विधेयकं प्रलंबित

  • कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ४० हून अधिक बिले आणि ४ अध्यादेश प्रलंबित आहेत.
  • अधिवेशनात ही विधेयकं मंजूर करण्याचे सरकारने आधीच नियोजन केले आहे.
  • कोरोनामुळे तीन सत्रे रद्द करावी लागली.
  • २०२० चे संपूर्ण हिवाळी अधिवेशन रद्द केले गेले.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ४ अध्यादेश 

  • होमिओपॅथी केंद्रीय परिषद (संशोधन) अध्यादेश
  • भारतीय औषध केंद्रीय परिषद (सुधारणा) अध्यादेश
  • राष्ट्रीय राजधानी क्षेत्र व त्याच्या आसपासच्या भागात वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोग अध्यादेश
  • दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) अध्यादेश व न्यायाधिकरण सुधारणा

 

कालावधी कमी होण्याची शक्यता

जुलै महिन्यात होणारे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. ते पूर्ण कालावधीसाठी न घेता औपचारिकता म्हणून फक्त २ ते ३ दिवसांसाठी घेतले जाण्याची शक्यता आहे. त्याऐवजी ते पुढे ढकलत कोरोना संसर्ग अधिक कमी झाल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलले जाण्याचीही शक्यता आहे.

• कोरोनामुळे संसदेच्या गेल्या तीन अधिवेशनांचा कालावधी कमी करण्यात आला होता.
• पावसाळी अधिवेशन दर वर्षी जुलैमध्ये आयोजित केले जाते.
• घटनेनुसार कोणतेही अधिवेशन सहा महिन्यात होणे आवश्यक आहे.
• त्यामुळे पावसाळी अधिवेशनसाठी सरकारकडे २४ सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे.
• त्यामुळे कालावधी कमी करुन जुलैमध्ये किंवा पुढे ढकलून जास्त दिवसांचे घेण्याचा प्रयत्न असेल.


Tags: Monsoon Sessionom birlaओम बिर्लापावसाळी अधिवेशन
Previous Post

कामगार विमा योजनेतील सदस्यांच्या कोरोना मृत्यूनंतर आश्रितांना दरमहा पेन्शन!

Next Post

आमदार प्रताप सरनाईकांचे ‘ते’ पत्र जसं आहे तसं…

Next Post
pratap sarnaik

आमदार प्रताप सरनाईकांचे ‘ते’ पत्र जसं आहे तसं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!