Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गडचिरोली पोलिसांची सकारात्मक कामगिरी, नक्षलवादावर ठरतोय व्यवसायाचा मार्ग भारी!

December 2, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
Gadchiroli police

मुक्तपीठ टीम

गडचिरोली म्हटलं की मागासलेला, दुर्गम आणि त्यामुळेच की काय नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांसाठी ओळखला जाणारा जिल्हा. पण गेली काही वर्षे निसर्गाचं वरदान लाभलेल्या या जिल्ह्याचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे.शिवसेनेचे नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या बळावर वेगवेगळ्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे. त्यातही जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांच्या कल्याणकारी उपक्रमामुळे नक्षलवादी महिलांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.

 

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वाखाली नक्षलावादाच्या वणव्यातून आदिवासींना बाहेर काढण्यासाठी वेगळे प्रयत्न सुरु आहेत. अनेक नक्षलवादी महिलांनी मधल्या काळात आत्मसमर्पण केले होते. फिनाईल व्यवसायात सामील होऊन त्यांनी उद्योजिका ही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या क्लीन 100 या फिनेलचे नुकतेच लाँचिंग झाले. त्याचबरोबर कृषी पर्यटन, व्यवसाय प्रशिक्षण या मार्गानेही पोलीस वेगळे बदल घडवत आहेत. पोलिसांची ही गांधीगिरी कोणत्याही हिंसाचाराला शांततेत बदलणारी नक्कीच ठरेल.

 

पोलिसांच्या पुढाकाराने सकारात्मक बदल!

  • गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० महिला आणि एका पुरुषासह ११ माजी माओवाद्यांचा यात समावेश आहे.
  • त्यांना फिनाईल बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
  • त्यातुन त्यांनी आता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
  • या फिनाईलचे ब्रँडचे नाव ‘क्लीन १०१’ आहे.
  • गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या पुढाकाराने आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षलवाद्यांसाठी नवा उपक्रम सुरु करण्यात आला.
  • त्यांच्या पुढाकाराने ‘नवजीवन उत्पादक संघ’ नावाचा स्वयंसहाय्यता गट सुरू करण्यात आला.

 

उत्तम दर्जाचे ‘क्लीन १०१’

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘क्लीन १०१’ फिनाईल अतिशय दर्जेदार असून त्याची किंमत इतर ब्रँडच्या तुलनेत खूपच कमी आहे.
  • गडचिरोली पोलीस विभागाकडुन या बचत गटाला त्यांच्या उत्पादनाच्या विपणनासाठी मदत करण्यात येणार आहे.
  • बचत गटाला विविध सरकारी आणि निमसरकारी विभागांकडून फिनाईलच्या ऑर्डरही प्राप्त झाल्या आहेत.
  • महाराष्ट्रातील अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने २०० लिटर ‘क्लीन १०१’ फिनाइल स्वयंसहाय्यता गटांकडून खरेदी करण्याचा आदेश दिला आहे.

 

“शरणागती पत्करलेल्या नक्षलवादी महिलांना स्वयं-सहायता गटात संघटित करून वर्धा येथील एमजीआयआरआय येथे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे पहिले उत्पादन ‘क्लीन १०१’ फ्लोअर क्लीनर नुकतेच लाँच करण्यात आले. पहिल्या काही महिन्यांत आम्ही त्यांना मदत करू. सुरुवातीला मिळालेल्या फिनाईलच्या विक्री ऑर्डर्समुळे महिलांना खुप प्रोत्साहन मिळाले आहे”, असे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: GadchiroliGadchiroli policeGood news MorningmuktpeethSuperintendent of Police Ankit GoyalterrorismUrban Development Minister Eknath Shindeगडचिरोलीगुड न्यूज मॉर्निंगनक्षलवादी भागनगरविकासमंत्री एकनाथ शिंदेपालकमंत्री एकनाथ शिंदेपोलीस अधीक्षक अंकित गोयलमुक्तपीठ
Previous Post

राज्यात ७६७ नवे रुग्ण, ९०३ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रेल्वेचं माताराणी पॅकेज, संपूर्ण यात्रा घडवणार सात हजारात!

Next Post
Darshan of Vaishnodevi

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रेल्वेचं माताराणी पॅकेज, संपूर्ण यात्रा घडवणार सात हजारात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!