Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुपोषणाविरोधातील लढ्यासाठी डिजिटल भांडार ‘पोषण ज्ञान’

April 14, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
poshan gyan

मुक्तपीठ टीम

मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचे उत्पादन करत असूनही भारतात कुपोषणाचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे पोषण सवयींविषयी योग्य ज्ञान देणाऱ्या वेबपोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे.

आरोग्य आणि पोषणविषयक माहिती देणाऱ्या ‘पोषण ज्ञान’ नामक राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल भांडाराचा नीती आयोगाने प्रारंभ केला. या उपक्रमामध्ये बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि अशोक विद्यापीठातील सामाजिक आणि वर्तनात्मक परिवर्तन केंद्र हेही भागीदार आहेत.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, महिला आणि बालविकास मंत्रालयाचे सचिव राममोहन मिश्रा आणि अतिरिक्त सचिव डॉ.राकेश सरवल यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले.

पोषण ज्ञान या संकेतस्थळाची निर्मिती हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असल्याचे मत, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी संकेतस्थळाचा प्रारंभ करताना व्यक्त केले. “प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील वर्तणूक बदलूनच खरे परिवर्तन प्रत्यक्षात आणता येऊ शकते. भारत हा अन्नाचे स्वतःच्या गरजेपेक्षा अधिक उत्पादन करणारा देश असूनही, येथे प्रचंड कुपोषणही आहे. याचाच अर्थ असा, की वर्तणुकीमध्ये परिवर्तन घडून येण्याची मोठी गरज आहे. हे लक्षात घेऊन आखलेला, पोषण ज्ञान हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. पोषण हे पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार जन आंदोलन होण्यासाठी याची मदत होऊ शकेल.” असेही डॉ.राजीव कुमार म्हणाले.

भारतातील पोषणविषयक आव्हानाचे सर्वोच्च प्राधान्य नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी विशद केले. “जे समाजघटक कुपोषणाला बळी पडू शकतात, उदा- गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, आणि सहा वर्षांखालील वयाची बालके, यांच्यावर भर देऊन, वर्तणूकविषयक सखोल माहिती देऊन हा प्रश्न सोडवता येईल” असे त्यांनी सांगितले.

महिला आणि बालविकास मंत्रालयाचे सचिव राममोहन मिश्रा यांनी पोषण ज्ञान या संकेतस्थळाच्या स्थापनेचे स्वागत केले. “समाजाची स्थिती सुधारण्यासाठी सहाय्यभूत ठरल्यावर ज्ञानाचा सर्वाधिक उपयोग होतो”, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ.राकेश सरवल यांच्या मार्गदर्शनांतर्गत, पोषण ज्ञान या माहिती भंडाराची संकल्पना विकसित झाली. आरोग्य आणि पोषणाशी संबंधित १४ पैलूंविषयी विविध भाषा, विविध माध्यमे आणि विविध जनसमुदायांसाठी तयार केलेल्या संवादात्मक साहित्यातून हवी ती माहिती शोधून घेण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. या भांडारासाठीची माहिती आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय आणि महिला व बालविकास मंत्रालय तसेच विकासात्मक कार्य करणाऱ्या संस्थांकडून संकलित करण्यात आली आहे.

पोषण ज्ञान नामक या माहितीभंडारात ‘क्राऊडसोर्सिंग’ प्रकारची एक विशिष्ट सुविधा देण्यात आली आहे. यामुळे संकेतस्थळावरील माहितीत भर घालण्याचे योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्तीला तसे करता येईल आणि नंतर एका समितीद्वारे त्याचे परीक्षण केले जाईल.

संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा- https://poshangyan.niti.gov.in/


Tags: कुपोषणनीती आयोगपोषण ज्ञान
Previous Post

चिमुकल्याचा दुधाचा दात, सर्वाधिक लांबीनं गिनीज बुकात नोंद!

Next Post

मुक्तपीठ: चांगल्या बातम्या, चांगले विचार…सर्व काही उपयोगी असं!

Next Post
muktpeeth good news policy

मुक्तपीठ: चांगल्या बातम्या, चांगले विचार...सर्व काही उपयोगी असं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!