मुक्तपीठ टीम
कोरोना काळात शाळा, महाविद्यालयांमध्ये संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहतात. त्याचवेळी या ऑनलाईन शिक्षणात काही नको ते प्रकार घडण्याचा धोका समोर आला आहे. मुंबईतील एका महाविद्यालयाच्या ऑनलाईन वर्गात अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विलेपार्ले भागातील नामांकित महाविद्यालयाच्या ऑनलाईन वर्गात अज्ञात आरोपींनी अश्लील व्हिडीओ सुरू केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवून जुहू पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
काय घडलं नेमकं?
- मिळाल्या माहितीप्रमाणे जेव्हा विलेपार्ले येथील एका महाविद्यालयाचा ऑनलाईन वर्ग सुरु असताना काही अज्ञात आरोपींनी अश्लील व्हिडीओ लावला.
- वर्ग सुरु असतानाच पॉर्न व्हिडीओ स्क्रिनवर सुरु झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.
- महाविद्यालयीन प्राध्यापकाने याबाबत तक्रार केली होती, त्या आधारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम २९२, ५७० आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- जुहू पोलिसांबरोबरच मुंबई सायबर सेलचे अधिकारीही संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा: ऑनलाइन शिक्षणात कशी टाळाल ‘पॉर्न’ घुसखोरी? या घ्या टिप्स…