ट्विटरने त्याच्या प्लॅटफॉर्मवर अॅन्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नवीन ऑडिओ चॅटिंग फिचर स्पेसेसची चाचणी सुरू केली आहे. ट्विटर मागील काही महिन्यांपासून आयएसओच्या एका लहान गटासह या फिचरची चाचणी करीत आहे. ट्विटर त्याच्या प्लेटफॉर्मवर ऑडिओ बेस्ड चॅटिंग फिचर जोडणार आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते ट्विटरवर एक रूम तयार करू शकतील आणि व्हॉइस गप्पा, व्हॉईस कॉन्फरन्स, व्हॉईस मीटिंग देखील करू शकतील.
मिळालेल्या माहितीनुयार हे ऑडिओ चॅट अॅप क्लबहाऊससारखे आहे. लॉकडाउनमधील क्लबहाऊसची वाढती लोकप्रियता पाहता आता ट्विटरनेही असा फिचर लॉन्च केला आहे.
ट्विटरनेही एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ते आता अॅन्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी चाचणी विस्तारत आहे. सध्या, हे फिचर्स निवडक अॅन्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आहे, जे या अॅपच्या बीटा प्रोग्रामचा भाग आहेत. या अॅपचे सध्या काम सुरू असल्याचेही ट्विटरने म्हटले आहे. ट्विटर त्याच्या स्पेसेसमध्ये इमोजी, रिपोर्ट्स, ब्लॉक करणे आणि ट्वीट शेअर करणे यासारख्या फिचर्सवर काम करत आहे. परंतु,हे फिचर्स सर्व वापरकर्त्यांसाठी किती काळ उपलब्ध असेल हे ट्विटरने स्पष्ट केले नाही.
ट्विटर स्पेसेस कसे वापरावे
१. ट्विटर अॅप उघडा
२. मुख्य स्क्रीनच्या डाव्या बाजूला वरच्या फ्लीट लाइनमधील + (प्लस)चिन्हावर टॅप करा आपले स्पीकर निवडा.
३. निवडलेला स्पीकर आणि उर्वरित वापरकर्त्यांना रूममध्ये जोडा. यामध्ये, फक्त स्पीकरच बोलू शकेल, इतर श्रोते म्हणून त्यात सामील होतील. नंतर आपण स्पीकर म्हणून इतर लोकांना जोडू शकतो.
४. काही वेळानंतर हे सुरू होईल, त्यानंतर आपण इथे बोलू आणि ट्विट करू शकतो.
५. ट्विटरने बोललेल्या शब्दांना लिखित शब्दांमध्ये रूपांतरित करणारा फिचरही यामध्ये दिला आहे.