मुक्तपीठ टीम
श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी अधिक खोल होत आहे. एका सरकारी सर्वेक्षणानुसार देशातील १० टक्के शहरी कुटुंबांकडे सरासरी १.५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे, तर भारतातील शहरांतील गरीब श्रेणीतील कुटुंबांकडे सरासरी फक्त २,००० रुपयांची मालमत्ता आहे. सरकारने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की शहरांमधील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील आर्थिक दरी सातत्याने वाढत आहे.
गावांमधील स्थिती थोडी चांगली
- सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालया अंतर्गत एक सर्वे करण्यात आला.
- राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) द्वारा आयोजित अखिल भारतीय क्रेडिट आणि गुंतवणूक सर्वेक्षण २०१९ नुसार ही माहिती स्पष्ट झाली आहे.
- ग्रामीण भागातील परिस्थिती शहरांच्या तुलनेत थोडी चांगली आहे.
- ग्रामीण भागातील दहा टक्के कुटुंबांकडे सरासरी ८१.१७ लाखांची मालमत्ता आहे.
- तर गरीब वर्गाकडे सरासरी फक्त ४१ हजार रुपयांची मालमत्ता आहे.
ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांची स्थिती चांगली आहे
- सर्वेक्षणातुन ही माहिती समोर आली आहे.
- गरीब घरांची स्थिती शहरांपेक्षा ग्रामीण भागात चांगली आहे.
- शहरांमधील निम्न श्रेणीच्या घरांची सरासरी मालमत्ता फक्त २००० रुपये आहे.
- राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) च्या ७७ व्या फेरी अंतर्गत अखिल भारतीय क्रेडिट आणि गुंतवणूक सर्वेक्षण आयोजित केले गेले आहे.
- हे सर्वेक्षण जानेवारी ते डिसेंबर २०१९ दरम्यान करण्यात आले.
- यापूर्वी ती २०१३ मध्ये ७० वी फेरी, २००३ मध्ये ५९ वी फेरी आणि १९७१-७२ मध्ये २६ वी फेरी करण्यात आली.
या क्रेडिट आणि गुंतवणुकीच्या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश ३० जुन २०१८ पर्यंत घरांच्या मालमत्ता आणि दायित्वांची मुलभुत परिमाणात्मक माहिती गोळा करणे होता. ग्रामीण भागातील ५,९४० गावांमधील ६९,४५५ घरांमध्ये आणि शहरी भागातील ३,९९५ ब्लॉकमधील ४७,००६ घरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.