मुक्तपीठ टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण प्रकरणी “सरकार हे नेहमी पालकत्वाच्या भूमिकेत असलं पाहिजे” असं सांगत अप्रत्यक्षरीत्या त्यांचे जुने मित्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजधर्माची आठवण करुन दिल्याची बातमी ‘मुक्तपीठ’ने शनिवारी दिली होती. आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत “महाराष्ट्र धर्म हाच राजधर्म” असल्याचे सूचक ट्विट केले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 28, 2021
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे
वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोडांच्या राजीनाम्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांचे जुने मित्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला होता. महिला अत्याचाराचे विषय राजकारणापलीकडे असले पाहिजेत, असं सांगताना त्यांनी सरकार हे नेहमी पालकत्वाच्या भूमिकेत असलं पाहिजे असं सांगत अप्रत्यक्षरीत्या त्यांचे जुने मित्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजधर्माचीच आठवण करून दिली असल्याचे मानले जाते.
आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले. संजय राऊत हे संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्याबाजूने असल्याचे सांगितले जाते. त्यांनी संजय राठोड राजीनामा देण्याबद्दलचं मतच मांडलं असल्याचं मानलं जातंय. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या हातातील “राजदंड दाखवणारे चित्र, महाराष्ट्र धर्म हाच राजधर्म” असे शब्द वापरल्याने तसेच सुचित होत असल्याची चर्चा आहे.
संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्रासह ट्विट केले आहे. त्यावर “सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो?, महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन!”, असा मजकूर आहे.
हे ही वाचा:
“सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असावे”…फडणवीसांकडून ठाकरेंना राजधर्माची आठवण?