Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

नाशिक मृत्यूकांडाने राजकीय नेतेही हेलावले…

April 21, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
nasik tragedy

मुक्तपीठ टीम

नाशिकमधील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे मोठी जीवितहानी झाली आहे. जीव वाचण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या २२ रुग्णांचा तेथेच मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंसह अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रपती राजनाथ कोविंद

महाराष्ट्रातील नाशिकमधील रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने मी फार दु: खी आहे. या अपघातात आपल्या प्रियजन गमावलेल्या कुटूंबियांबद्दल मी मनापासून द:ख व्यक्त करतो. मी इतर सर्व रूग्णांचे स्वास्थ त्वरित बरे होण्याची इच्छा करतो.

 

नासिक, महाराष्ट्र में अस्पताल के ऑक्सीजन टैंक में गैस लीक होने के कारण मरीजों की मृत्यु होने की दुर्भाग्यपूर्ण घटना से बेहद व्यथित हूँ। इस हादसे में अपने प्रियजनों को खोने वाले परिवारों के प्रति मेरी गहरी शोक संवेदनाएं। मैं सभी अन्य मरीज़ों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूँ।

— President of India (@rashtrapatibhvn) April 21, 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘नाशिक येथील रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना हृदयद्रावक आहे. यात जीवितहानी झाल्यामुळे व्यथित झालो आहे. या दुःखाच्या काळात मृतांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो.’

 

नाशिक येथील रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना हृदयद्रावक आहे. यात जीवितहानी झाल्यामुळे व्यथित झालो आहे. या दुःखाच्या काळात मृतांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो.

— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत. तसेच, या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करतो. नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे.

कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात. यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

महाराष्ट्र शोकमग्न आहे!
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/l4cBfMOxEO

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2021

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन लिक झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, ही बाब अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

 

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन लिक झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, ही बाब अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🏽#oxygenleak #NashikTragedy pic.twitter.com/Db7hDXTdPP

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 21, 2021

 

राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं, असे राज ठाकरे म्हणाले.

 

ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं.

— Raj Thackeray (@RajThackeray) April 21, 2021

 

खासदार अरविंद सांवत, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते

नाशिकच्या दुर्घटनेमुळे मन सुन्न झाले, व्याकुळ झाले…
राज्य सरकारने अर्थसहाय्य दिले आहे, अपघाताची खोलात जाऊन उच्चस्तरीय चौकशी देखील करण्यात येणार आहे. या घटनेत दगावलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबांच्या दु:खात आम्हीं सर्वजण सहभागी आहोत, असे अरविंद सांवत म्हणाले.

 

नाशिकच्या दुर्घटनेमुळे मन सुन्न झाले, व्याकुळ झाले…
राज्य सरकारने अर्थसहाय्य दिले आहे, अपघाताची खोलात जाऊन उच्चस्तरीय चौकशी देखील करण्यात येणार आहे. या घटनेत दगावलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबांच्या दु:खात आम्हीं सर्वजण सहभागी आहोत.

— Arvind Sawant (@AGSawant) April 21, 2021

 

अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

नाशिक मध्ये झालेल्या या दुर्देवी घटनेची चर्चा दिल्ली पर्यंत होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री यांनीही ट्विट करतआपले दु:ख व्यक्त केलं आहे. केजरीवाल बोलले की, ऑक्सिजन टँक फुटल्यामुळे नाशिकच्या रूग्णालयात झालेला अपघात अतिशय खेदजनक आहे. मृतांच्या नातेवाईकांसोबत मी दु:ख व्यक्त करतो.देव प्रत्येकाला अशा दुर्घटनांपासून वाचवो.

 

नासिक के अस्पताल में ऑक्सीजन टैंक लीक होने से हुआ हादसा बेहद दुखद है। मृतकों के परिजनों के साथ मेरी संवेदनाएँ। ईश्वर सबको इस तरह के हादसों से बचाकर रखें।

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 21, 2021

 

नारायण राणे, खासदार, भाजपा

नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना प्राण गमावावे लागल्याची घटना अतिशय हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेमुळे संपुर्ण राज्य सुन्न झाले आहे. मृतांना मनोभावे श्रद्धांजली व नातेवाईकांप्रति सहवेदना व्यक्त करतो.

 

नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना प्राण गमावावे लागल्याची घटना अतिशय हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेमुळे संपुर्ण राज्य सुन्न झाले आहे. मृतांना मनोभावे श्रद्धांजली व नातेवाईकांप्रति सहवेदना व्यक्त करतो. #Nashik

— Narayan Rane (@MeNarayanRane) April 21, 2021

 

सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

नाशिकमधील डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची गळती होऊन काही रुग्ण दगावल्याची बातमी आहे. हे वृत्त अतिशय हृदयद्रावक आहे. या घटनेत दगावलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे.

 

नाशिकमधील डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची गळती होऊन काही रुग्ण दगावल्याची बातमी आहे. हे वृत्त अतिशय हृदयद्रावक आहे. या घटनेत दगावलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. https://t.co/jWcMqgWbQp

— Supriya Sule (@supriya_sule) April 21, 2021

 

नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयातील दुर्घटनेत २२ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ह्रदय पिळवटून टाकणारे आहे. काँग्रेस पक्ष मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

 

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयातील दुर्घटनेत २२ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ह्रदय पिळवटून टाकणारे आहे.

काँग्रेस पक्ष मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

— Nana Patole (@NANA_PATOLE) April 21, 2021


Tags: devendra fadnavisnana patolenashik tragedyRaj Thackeraysupriya suleडॉ. झाकीर हुसेन रुग्णालयनाशिकपंतप्रधान नरेंद्र मोदीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराष्ट्रपती राजनाथ कोविंद
Previous Post

दुहेरी संरक्षणासाठी दुहेरी मास्‍क?

Next Post

महाराष्ट्राला आणखी ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज!

Next Post
rajesh tope

महाराष्ट्राला आणखी ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!