मुक्तपीठ टीम
गेल्या दोन वर्षापासून जगात कोरोनाचे सावट आहे. कोरोनानंतर प्रत्येकाच्या जीवशैलीत मोठे बदल झाले आहेत. प्रत्येकजण आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहारावर आणि योग्य व्यायामावर भर देत आहे. फिटनेसवर वयोवृद्धापासून ते लहान मुलांपर्यंत भर देणे आवश्यक मानले जात आहे. मात्र, एक मोठा वर्ग आजरही शारीरिक तंदुरुस्तीकडे दुर्लक्षच करतो. त्यामुळेच योग्य फिटनेसचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने देहू ते पंढरपूर अशी २३४ किलोमीटर सायकल वारी केली आहे. राम गोमारे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते हिंजवडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी कार्यरत आहेत.
व्यायाम करण्याचे गोमरेंचे आवाहन
- व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी देहू ते पंढरपूर असा सायकलवरून प्रवास करायच ठरवले होते.
- देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेत गोमारे यांनी पंढरपूरपर्यंत सायकल प्रवास केला आहे.
- केवळ एका ठिकाणी दहा मिनिटांचा थांबा घेत गोमारे यांनी पंढपूर गाठले आहे.
- सलग आठ तास सायकल चालवत राम गोमारे यांनी देहू ते पंढरपूर असा २३४ किलोमीटर प्रवास केला आहे.
- त्यामुळे गोमारे यांनी पंढरपूर पर्यंत फिटनेस वारीच केली आहे.
- कोरोनाकाळात पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम करणं गरजेचं असल्याचं सांगत राम गोमारे यांनी दररोज किमान एक तास स्वतःसाठी देऊन व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे.
राम गोमारेंचेही आयुक्त कृष्णप्रकाशांप्रमाणेच फिटनेसला महत्त्व!
- राम गोमारे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मेहनत घेत सायकलिंग, स्विमिंग आणि धावण्याचा व्यायाम सुरू ठेवला आहे.
- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हेदेखील फिटनेसच्या बाबतीत नेहमीच जागरूक असतात.
- त्यांचाच आदर्श समोर ठेवत राम गोमारे यांनीही फिटनेसला महत्त्व दिले आहे.
- मात्र, आपण स्वतः तर धडधाकट राहूच पण पोलीस सहकारी, इतर मित्रांना देखील फिटनेसचे महत्त्व पटवून देऊ असे गोमारे यांनी म्हटले आहे.