रोहिणी ठोंबरे
कोरोनातील महामारीच्या या काळात रोज काहींना काही नवीन ऐकायला मिळत असते. अशीच ही एक चांगली बातमी आहे. मुंबईच्या जोगेश्वरी विभागातील तरूणाई त्यांच्या एका अनोख्या मोहिमेतून मदतीसाठी पुढे सरसावली आहे. लॉकडाउनच्या काळात मुंबईच्या जोगेश्वरीतील तरूणाईनं एक वेगळाच ध्यास घेतला आहे. तरुण वर्ग पॉ पेट्रोलिंगच्या माध्यमातून भटक्या प्राणीमात्रांना अन्न पुरवत आहे. कॉलेजमध्ये शिकणारी ही तरूणाई लॉकडाउनमुळे घरातच अडकली आहे त्यामुळे त्यांनी ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. २ ऑगस्ट २०२० पासून त्यांनी पॉ पट्रोलिंग नावाने हे काम सुरू केले आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी सुरू असताना माणसांसह भटक्या प्राण्यांनाही अन्न आणि निवाऱ्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. हे पाहता या तरूणाईने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांना आनंदही मिळू लागला आणि प्राण्यांकडे पाहता त्यांचे सर्व ताणही दूर झाले.
कसं चालतं तरुणाईचे पॉ पेट्रोलिंगचे?
• दर आठवड्याला ही स्वयंसेवक असणारी तरूणाई स्वत: आपल्या खिश्यातून ५० रूपये काढते.
• सुट्टीचा दिवस म्हणजेच रविवारी एकत्र येऊन प्राण्यांना खाऊ घालतात.
• ते जमलेल्या पैश्यातून या प्राण्यांना मांस आणि भात शिजवून खाऊ घालतात.
• त्यांचा १२ ते १५ जणांचा ग्रुप आहे. यातील सर्व नेहमी येऊ शकत नाहीत.
• परंतु ४ ते ५ सदस्य आहेत जे नेहमी हजर असतात.
• त्यांचा ग्रुप शक्य तितक्या मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करतात.
• त्यांना अभिमानही आहे की, ते स्वत: च्या खर्चाने प्राण्यांना अन्न पुरवतात.
• जोगेश्वरीतील शहीद हेमंत करकरे उद्यान, शहीद अशोक कामठे उद्यान, सर्वोदय नगर, कोकण नगर, मेघवाडी, पूनम नगर इत्यादी भागात ते भटक्या प्राणीमात्रांना मदत करण्यास नेहमी सज्ज असतात.
काहीवेळेस त्यांना बर्याच अडचणींचा सामना करावा लागतो. कधीकधी देणगीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठी पोस्ट करतात. बरेच अनेकजण ते पाहूनही दुर्लक्ष करतात. त्यामुळे काहीवेळेस प्राण्यांना अन्न पुरवण्याविषयी आणि त्यांचे उपचार करण्याबाबत समस्या आणि नैराश्य येते.
त्यांनी मुक्तपीठला दिलेल्या माहितीनुसार, “२०२१ च्या सुरूवातीला आम्हाला बर्याच अडचणींचा सामना करावा लागला. ज्यामुळे आम्हाला पॉ पट्रोलिंग बंद करावी लागली. प्राणी खायला मिळत नसल्याने ते आमच्या शोधात होते म्हणून, आम्ही १ किंवा २ महिन्यांनंतर ही सेवा पुन्हा सुरू केली. भविष्यात आम्हाला कितीही त्रास सहन करावा लागला तरी आम्ही नक्कीच त्यांना मदत करू.”
पॉ पट्रोलिंगच्या या ग्रुपमध्ये नयन विश्वकर्मा, अंकिता शितप, शिवम पाडेलकर, धीरज शितप, वैभव कदम, नवीन विश्वकर्मा, साक्षी जगुष्टे, शुभदा जाधव अशा या सर्व तरूणाईचा समावेश आहे.
मुक्तपीठ टीमच्या पॉ पेट्रोलिंग करणाऱ्या तरुणाईला शुभेच्छा!
मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी यांच्याशी संपर्क साधावा.
नयन विश्वकर्मा 91521 87388
शिवम पाडेलकर 84248 37399
Gpay 9820391953
पाहा व्हिडीओ: