मुक्तपीठ टीम
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांग्लादेश दौर्यावर गेले होते. त्यांचा दौरा सुरु असताना बांग्लादेशात फेसबूक ब्लॉक करण्यात आले होते. त्याचे कारण धर्मांध संघटनांकडून मोदींच्या दौऱ्याच्यावेळी त्या देशात असंतोष भडकवण्याचा कट होता असे कळते. ते दौऱ्यावर असताना आणि परत आल्यावरही बांग्लादेशात हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.
बांग्लादेशातील धर्मांध संघटनांनी हिंदू मंदिरांसह ट्रेनवर हल्ला करण्यात आला आहे. या हिंसक आंदोलनात अनेक लोकांना आपले प्राण गमावले लागले आहे. आतापर्यंत ठार झालेल्या लोकांची संख्या १२ असल्याचे सांगितले जाते. तसेच यात वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
बांगलादेशमधील कट्टरपंथीय इस्लामिक संघटनांनी पूर्व बांग्लादेशातील हिंदू मंदिरांवर आणि रेल्वेवर हल्ला केला. यात १२ गुंडांना आपला जीव गमावल्याची माहितीसमोर येत आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी या संघटनांनी या दौऱ्याचा निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दाट लोकवस्ती असलेल्या ढाकामध्ये पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या गोळ्यांचा वापर करावा लागला होता. त्यानंतर हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले होते.
दरम्यान, या घटनेबद्दल एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिफाझात ए इस्लाम समूहच्या समर्थकांनी पूर्वेकडील ब्राह्मणबेरियातच्या पूर्व जिल्ह्यामधील एका ट्रेनवर हल्ला केला होता, त्यात १ जण जखमी झाले. तसेच त्या ट्रेनच्या इंजिनरुमच्या सोबत जवळपास सर्व डब्यांचे त्यांनी नुकसान केले. याच दरम्यान, सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली आणि हिंदूंच्या मंदिरांवरीही हल्ले करण्यात आले, असे एका स्थानिक पत्रकारांनी सांगितले आहे.