मुक्तपीठ टीम
पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे जाहीर सभा घेतली. यादरम्यान एक घटना घडली जी, सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. चंदनखेडा येथे झालेल्या जाहीर सभेत व्यासपीठावर उपस्थित जिल्हाध्यक्षांच्या पायाला पंतप्रधान मोदींनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी हे करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकताच तो व्हायरल झाला. लोकांनी पटकन ते त्यांच्या वैयक्तिक व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि फेसबुक पेजेसवर शेअर करायला सुरुवात केली आणि संध्याकाळपर्यंत व्हिडीओने खळबळ पसरवली.
A dalit leader touches the feet of PM #NarendraModi today in Unno #UttarPradesh, to which Modi ji told him not to do that and went on to touch the feet of that Dalit leader. Respect 😍 pic.twitter.com/wBhm1GWCMm
— Divided Hindu (@LiberalAadmi) February 20, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्हाध्यक्षाच्या पाया का पडले? काय आहे या मागचे खरे कारण?
- उन्नावच्या चंदनखेडा येथील जाहीर सभेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांनी पंतप्रधानांना राम दरबाराचे स्मृतिचिन्ह अर्पण केले.
- यावेळी जिल्हाध्यक्षांनी पंतप्रधानांच्या पायाला स्पर्श केला, त्यावर पंतप्रधानांनी त्यांना तसे करण्यास मनाई केली. संघटनेच्या प्रत्येक अधिकारी व कार्यकर्त्यांचा आदर करतो, असे सांगितले.
- यानंतर पंतप्रधानांनी नतमस्तक होऊन जिल्हाध्यक्षांच्या चरणांना स्पर्श केला. जिल्हाध्यक्षांनी सांगितले की, पंतप्रधानांनी त्यांच्या पायाला हात लावण्यास नकार दिला आणि नंतर स्वतः वाकून नमस्कार केला.
मोदी याआधीही पाया पडणाऱ्यांच्याच पाया पडले…
PM @narendramodi touches feet of a woman much younger to him. pic.twitter.com/eXJ5Axm850
— Vikas Bhadauria (@vikasbha) January 2, 2020
पैर छूने वाले के पैर छूना जीवनमुक्त महात्मा का लक्षण होता है। @narendramodi जी 🙏🙏🙏pic.twitter.com/3zRLZQd1N2
— Divya Kumar Soti (@DivyaSoti) March 24, 2021