Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

१५ वर्षावरील मुले आणि बुस्टर डोसची घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी कोणत्या मुद्द्यांवर भर दिला?

December 26, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
narendra modi

मुक्तपीठ टीम

भारतात ओमायक्रॉनचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन पंतप्रधानांनी शनिवारी देशाला संबोधित केले.यावेळी त्यांनी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याची घोषणा केली. तसेच कोरोनाविरोधात लढा देणारे फ्रंट वर्कर म्हणजेच कोरोना योद्ध्यांनाही बुस्टर डोस देण्यात येणार आहे असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

 

देशवासियांना संबोधीत करताना पंतरप्रधान मोदी म्हणाले, “भारताने यावर्षी १६ जानेवारीपासून आपल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली. तो एक सामूहिक प्रयत्न होता. याचा परिणाम म्हणून आज देशात १४१ कोटी डोस देण्यात आले आहेत. आपण १४१ कोटी लसींचे मोठे लक्ष्य पार केले आहे. लसीकरणाबाबत आपण सातत्याने काम केले आहे. आपण जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली. आज भारतातील ६१ टक्क्यांहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, सुमारे ९० टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचा एकच डोस देण्यात आला आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कॉ-मॉरबिडिटी असलेल्या नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीच्या Precaution Dose चा पर्याय उपलब्ध होईल. हे लसीकरण देखील १० जानेवारीपासून उपलब्ध होईल”.

 

मोदींच्या घोषणा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला संबोधित करताना त्यांनी कोरोना संसर्गापासून सावध राहण्याचा सल्ला दिला.
    कोरोनावर मात करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
  • ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याची घोषणा केली होती, तर १० जानेवारीला आघाडीवर काम करणाऱ्यांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याची घोषणा केली होती, ६० वर्षांवरील व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची घोषणा केली.

पंतप्रधानांनी मांडलेले मुख्य मुद्दे-

  • कोरोनाविरुद्धच्या लढाईत हात धुण्याची आणि मास्क लावण्याची सवय वाढत आहे.
  • देशात १८ लाख आयसोलेशन बेड, पाच लाख ऑक्सिजन बेड, १,४०,००० ICU बेड आहेत.
  • मुलांसाठी बी आयसीयू आणि नॉन आयसीयू बेड आहेत.
  • देशात ३,००० हून अधिक PSA ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत, देशभरात चार लाख ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले आहेत.
  • आवश्यक औषधांच्या बफर डोससाठी राज्यांना मदत करण्यात आली आहे.
  • राज्यांना पुरेशा चाचणी किटसाठीही मदत केली जात आहे.

Previous Post

“अध्यापक विकास संस्था नवा दृष्टीकोन देणारी ठरेल” – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

अभिनेत्रीची आत्महत्या! एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या प्रायव्हेट आर्मीच्या वसुलीकडे नवाब मलिकांचे बोट!

Next Post
nawab malik

अभिनेत्रीची आत्महत्या! एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या प्रायव्हेट आर्मीच्या वसुलीकडे नवाब मलिकांचे बोट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!