मुक्तपीठ टीम
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना २ हजारांच्या तीन हप्त्यामध्ये वर्षभरात सहा हजार रुपये सरकारतर्फे मिळतात. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा हप्ता आज लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. सकाळी ११ वाजता देशभरातील साडे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा होणार आहेत.
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, 14 मई 2021 प्रातः 11:00 बजे #PMKisan योजना के तहत देश के 9.5 करोड़ किसानों के खातों में 8वीं किस्त के तौर पर रु. 19,000 करोड़ की राशि DBT के माध्यम से हस्तांतरित करेंगे…
इस इवेंट से लाइव जुड़ने के लिए रजिस्टर करें : https://t.co/8IRCLWb674 pic.twitter.com/EtuyV09Fmf
— Narendra Singh Tomar (@nstomar) May 13, 2021
या योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकर्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेबद्दल तपासायचे असेल तर सोपे आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी खाते कसे तपासायचे याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
कसं तपासाल पीएम किसान निधीचं खातं?
- सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
- वेबसाइट ऑपन केल्यानंतर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
- यानंतर Beneficiary status पर्यायावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर एक नवा पेज ऑपन होईल.
- त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल. येथे नोंदणीकृत शेतकरी त्यांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी हप्त्याशिवाय अन्य माहिती मिळवू शकतात.
हा मेसेज दिसल्यास काळजी करण्याची गरज नाही
वर नमूद केलेली माहिती प्रविष्ट केल्यानंतर स्मार्टफोन / संगणक स्क्रीनवर ‘एफटीओ जनरेटर अॅण्ड पेमेंट कन्फर्मेशन इज पेंडिंग’ असे दिसून येईल. पण असे दिसल्यास काळजी करण्याची गरज नाही. कारण याचा अर्थ पंतप्रधान किसान सन्मान निधी हप्ता प्रक्रियेत आहे आणि तो लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल.