मुक्तपीठ टीम
यूट्युबने टीव्हीवर आपले अस्तित्व वाढवण्यासाठी एक नवीन फिचर लॉंच केले आहे. हे नवीन फिचर यूजर्सना त्यांचे टीव्हीवर आयओएस किंवा अॅंड्रॉईंड स्मार्टफोनशी कनेक्ट करण्यास परवानगी देईल जेणेकरून, व्हिडीओ डिव्हाइसेसमध्ये सिंक होऊ शकतील. पूर्वी, यूजर्स केवळ फोनवर व्हिडीओ आढळल्यास आणि तो टीव्हीवर कास्ट केला जात असेल तरच त्यांना टीव्हीवर यूट्यूब व्हिडिओ पाहता येत होता.
यामुळे यूट्यूबने हे फीचर आणले आहे
- ८० टक्क्यांहून अधिक लोक म्हणाले की, ते टीव्ही पाहताना दुसरे डिजिटल डिव्हाइस वापरतात.
- या कारणास्तव, कंपनीने हे फीचर यूजर्ससाठी सादर केले आहे.
- या फीचरमुळे यूजर्सना आता व्हिडीओ कास्ट करण्याची गरज भासणार नाही.
फिचर वापरण्यासाठी काय करावे लागणार आहे?
- हे फिचर वापरण्यासाठी, यूजर्सने खात्री करणे आवश्यक आहे की त्यांनी फोनच्या अकाउंटने टीव्हीवर साइन इन केले आहे.
- आता, स्मार्टफोनवर यूट्यूब अॅप उघडा आणि सूचित केल्यावर “कनेक्ट” क्लिक करा.
- एकदा दोन डिव्हायस अॅक्टिव्ह झाल्यानंतर, यूजर्स व्हिडिओंवर कमेंट देऊ शकतात, नेक्स्ट प्लेसाठी लाइनअप, लाईक करू शकतात आणि थेट त्यांच्या फोनवरून सब्सक्रिप्शन घेऊ शकतात.
- टीव्हीवर यूट्यूब कंटेंट पाहण्यासाठी थेट फोनवरून सर्च बार देखील वापरू शकतात.
कास्टिंगचा पर्याय निवडावा लागणार नाही
- यूट्यूबने यावर्षी फेब्रुवारीमध्ये हे फीचर आणण्याचे घोषित केले होते.
- या फिचर्ससह, यूजर्स यापुढे कास्टिंग पर्याय निवडावा लागणार नाही.
- यापूर्वी, यूजर्सना फोन टीव्हीशी कनेक्ट करण्यासाठी यूट्यूब मोबाइल अॅपमधील कास्ट पर्यायावर टॅप करावे लागत असे.
- हे सर्व्हर-साइड रोलआउट आहे की नाही किंवा हे फिचर मिळविण्यासाठी अॅप अपडेट करावे लागेल याची अद्याप पुष्टी झालेली नाही.