मुक्तपीठ टीम
कानपूरमधील अत्तर व्यावसायिक पियुष जैन यांच्या घरातून १८१ कोटी सापडल्यानंतर त्यांच्या कन्नौजच्या घराच्या भिंती, फरशी, छत आणि तळघरात करोडो रुपये आणि सोने-चांदी सापडले आहेत. अगदी सिनेमात दाखवतात तसचं त्यांच्या घरी सोनं-चांदी पैसै सापडले आहेत. रविवारी तिसर्या दिवशी कन्नौजमध्ये GST इंटेलिजेंस डायरेक्टोरेट जनरल (डीजीजीआय) आणि आयकर विभागाच्या कारवाईत सुमारे ११० कोटी रुपये रोख आणि २७५ किलो सोने आणि चांदी सापडली. सध्या मशिनद्वारे नोटा मोजण्याचे काम सुरू आहे. रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कर बुडवल्याच्या संशयाखाली, डीजीजीआय पथकांनी बुधवारी कानपूरमधील शिखर पान मसाला, गणपती ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी छापे टाकले. येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी अत्तर व्यापारी पियुष जैन यांचे गुजरात, मुंबईत, कानपूर, कन्नौज येथील घर, कारखाना, कार्यालय, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंपावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.कानपूरमध्ये मिळालेल्या रकमेची मोजणी पूर्ण झाल्यानंतर, डीजीजीआय टीमने पियुषनां ताब्यात घेतले आणि कन्नौजच्या येथिल घरावर छापा टाकला. शनिवारी येथे नोटांनी भरलेली आठ पोती जप्त करण्यात आली. तिसर्या दिवशी पियुष जैन यांचे चिप्पट्टी येथील वडिलोपार्जित घर, इतर दोन घरे आणि शेजारील गोडाऊनवर छापे टाकण्यात आले. वडिलोपार्जित घराच्या भिंती, फरशी, छत आणि तळघरातून ११० कोटी रुपये रोख, २५० किलो चांदी आणि २५ किलो सोने सापडले आहे.
१० ते २००० च्या नोटांचे बंडल सापडले
- पियुष जैन यांच्या बेडरूममध्ये प्लाय आणि रेक्सिनपासून बनवलेल्या शोपीसच्या भिंतीच्या आतून सर्वात मोठी रक्कम सापडली.
- याशिवाय पायऱ्यांच्या आतून काही पैसेही सापडले.
- जप्त करण्यात आलेल्या रुपयांमध्ये दोन हजार, पाचशे, शंभर आणि दहा-दसाच्या नोटांचा समावेश आहे.
- गुजरातमधील अहमदाबाद आणि लखनौ येथील दोन पथकांनी तपास प्रक्रियेची माहिती घेतली.
आता रक्कम वाढणार
- भिंती तोडण्यासाठी सुमारे १० मजूर कामावर होते.
- हे लोक गॅस वेल्डिंग कटर आणि छिन्नी-हातोड्याने भिंती आणि लॉकर तोडण्यात व्यस्त होते.
- दरवाजे उघडण्यासाठी डुप्लिकेट चाव्या बनवण्यासाठी पाच कारागीर गुंतले आहेत.
आतापर्यंतच्या तपासात सापडलेल्या नोटांची मोजणी घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू आहे. सोन्या-चांदीच्या वजनासाठी देशी तराजूही आणण्यात आले. आणखी रोकड मिळण्याची शक्यता वर्तवत सोमवारी सकाळपर्यंत तपास सुरू राहणार असल्याचे डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.