Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई रेल्वेमार्गात पाणी तुंबण्याच्या समस्येसाठी आयआयटीची मदत घेतली जाणार!

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेतला रेल्वेच्या मान्सूनसाठीच्या तयारीचा आढावा

June 12, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
piyush goyal

मुक्तपीठ टीम

जोरदार पावसाने मुंबईच्या रस्त्ते जसे नद्यांमध्ये बदलले तसेच रेल्वेमार्गांचीही स्थिती कालव्यांसारखी झाली होती. त्याची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. भारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वे मान्सूनसाठी पूर्णपणे सज्ज असणे आवश्यक आहे, असे बजावत त्यांनी पावसाळ्याच्या सर्व आपत्कालीन उपाययोजनांबाबत मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सज्जतेचा आणि रणनीतीचा आढावा घेतला. पावसामुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी रेल्वेच्या तांत्रिक आणि नागरी कामांच्या उपक्रमांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईसारख्या संस्थांशी भागीदारी करण्याचा सल्लाही त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.

 

ते म्हणाले की, रेल्वे सेवा सुरळीत आणि अखंडितपणे सुरू राहील हे सुनिश्चित करण्यासाठी नवोन्मेषी उपक्रम आणि परिश्रम एकत्र केले गेले पाहिजेत. पावसाळा सुरू होताच मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे वचनबद्ध आहे.

 

रेल्वेमार्गातील पूरस्थितीची ठिकाणे शोधून उपाय

• गेल्या पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवलेली ठिकाणे शोधण्यात आली आणि प्रत्येक ठिकाणांसाठी अनुकूल उपाययोजना तयार करण्यात आल्या. उदा. वांद्रे, अंधेरी, माहीम, ग्रँट रोड, गोरेगाव.
• कोरोना महामारीच्या दरम्यानही, मुंबईत खास सुधारित रेल्वे डब्यांसह तीन कचरा साफ करणाऱ्या ‘मक स्पेशल’ गाड्या तैनात करून उपनगरी विभागातील २ लाख १० हजार घन मीटर क्षेत्रातील घाण / कचरा / जमिनीच्या साफसफाईसाठी रेल्वेने खडतर प्रयत्न केले आहेत.
• बोरिवली विरार विभागातील नाल्याच्या साफसफाईची पाहणी आणि देखरेखीसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता आणि नाल्याची खोलवर साफसफाई करण्यासाठी शोषयंत्रे / गाळ काढणारी यंत्रे वापरण्यात आली.

 

पावसाच्या अचूक माहिती आणि उपाययोजनेसाठी प्रयत्न

• पावसाबद्दल प्रत्यक्ष वेळी,अचूक माहिती मिळावी या दृष्टीने स्वयंचलित पाऊस परिमाण (एआरजी) भारतीय हवामान विभागाच्या सहकार्याने चार ठिकाणी तर पश्चिम रेल्वेद्वारे स्वतंत्रपणे दहा ठिकाणी स्थापित केले आहेत.
• सांडपाणी आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी पाण्याच्या आतील पंपांसह रेल्वेमार्ग आणि डेपोवर पुरविण्यात आलेल्या पंपांची संख्या ३३% वाढली आहे.
• कमीत कमी पाणी साचेल या दृष्टीने, नाला बांधताना नवीन मायक्रो टनेलिंग पद्धतीचा अवलंब केला गेला.

 

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या बैठकीला रेल्वे मंडळ आणि मुंबईचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Tags: mumbaimumbai rainpiyush goyalरेल्वेमंत्री पीयुष गोयल
Previous Post

भारतातही कुत्रे शोधणार कोरोना आणि कर्करोग, खास प्रशिक्षण मिळणार

Next Post

सरकारी जलविद्युत कंपनी एनएचपीसीला ३,२३३ कोटी रुपये नफा

Next Post
NHPC

सरकारी जलविद्युत कंपनी एनएचपीसीला ३,२३३ कोटी रुपये नफा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!