मुक्तपीठ टीम
जगभरात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ओटीटीच्या क्षेत्रात आता आपल्या मराठी उद्योजकानेही प्रवेश केला आहे. पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून उद्योजक जीवन बबन जाधव राष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांनी ‘पिंग पॉंग’ हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म हिंदीत लाँच केला आहे.
‘ग्रीन व्हॅली डेव्हलपर्स’, ‘टायगर ग्रुप’ या बांधकाम कंपन्यांचे ते प्रमुख असून या क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. आता मनोरंजन क्षेत्रात व्यावसायिक भूमिकेतून पदार्पण केले आहे. ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ या ओटीटी निर्मितीद्वारे भारतातील अस्सल हिंदी टॅलेंट जगभर पोहचविण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
ओटीटी मनोरंजानच्या कक्षा रुंदावतायत…
• ओटीटी हे अल्पावधीतच जगभरात प्रचंड लोकप्रिय प्लॅटफॉर्म ठरले आहे.
• या प्लॅटफॉर्मवर स्पर्धाही तगडी आहे.
• जगभरातील सर्वोत्तम टॅलेंट या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत असल्याने प्रेक्षकांची रुची क्षणाक्षणाला बदलत असते.
• अद्ययावत तंत्रज्ञानासोबतच सर्वोत्तम भारतीय टेलेन्ट घेऊन ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’ हे ओटीटी चॅनेल सज्ज झाले आहे.
• येत्या काही दिवसामध्ये ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ आपला अपेक्षित टप्पा गाठण्यात यशस्वी होईल असे या चॅनेलचे सर्वेसर्वा निर्माते उद्योजक जीवन बबन जाधव यांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिक कशासाठी ओटीटी मनोरंजन क्षेत्रात?
• ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ या वाहिनीच्या निर्मितीबाबत बोलताना या वाहिनीचे सर्वेसवा सीएमडी जीवन बबन जाधव यांनी पुढील मुद्दे मांडले:
• मराठी माणूस हुशार, मेहनती, प्रामाणिक आणि त्याच्यात चिकाटी वृत्ती असल्याने वेगवेगळ्या नोकरी, व्यवसायामध्ये जगभरात यशस्वी आहे.
• नव्या आव्हानांचा सामना करण्यात मराठी उद्योजक अग्रेसर आहेत. आपल्या मातृभाषेसोबतच राष्ट्रीय हिंदी भाषेचा नेहमीच सन्मान करीत आला आहे.
• मनोरंजन क्षेत्रात ओटीटी चॅनलद्वारे पदार्पण करीत असताना ते हिंदी असावे असे वाटत होते.
• भारतीय भाषेतील हे चॅनेल नेमके कसे असावे याचा सखोल अभ्यास करूनच या चॅनेलची निर्मिती केली आहे.
• जागतिक स्पर्धेत ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ टिकून राहण्यासाठी अनोखे उपक्रमांसोबतच नवनवे टॅलेंट लॉन्च करणार आहे.
• पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ने वेळेआधीच अपेक्षित टप्पा गाठून यशस्वी घोडदौड सुरु केली आहे.
• आमच्या वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्स, बॉलिवूड फिल्म्स सोबत इतर मनोरंजनाचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार आहेत, त्यासाठी आमची टॅलेंट रिसर्च मॅनेजमेंट टीम अहोरात्र कार्यरत आहे.
‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला प्रतिसाद कसा?
‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने प्रतिसादाबद्दल पुढील दावा केला आहे:
• अठरा ते ऐंशी अशा सगळ्याच वयोगटातला भारतासह जगभरातील भारतीय प्रेक्षकवर्ग ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला लाईक करीत आहे.
• सध्या चॅनेलवरील निवडक वेगवेगळे कार्यक्रम पाहण्यात प्रेक्षक गर्क आहेत.
• अल्पावधीतच ५० हजार सबस्क्राइबर्स ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ सोबत जोडले गेले आहेत.
• येत्या काळात ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’च्या काही हिंदी वेबसीरिज, वेब चित्रपट, लघुपट आणि नवीन संहिता असलेले काही नवे शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ कसे मिळवाल?
ओरिजनल मनोरंजनाचा अमर्याद आनंद मिळविण्यासाठी आपल्याला ‘गुगलप्ले स्टोअर’ किंवा ‘ॲपस्टोअरवर’ जाऊन ‘पिंग पोंग’ हे ॲप डाऊनलोड करावे लागेल किंवा ttps://pingpongentertainment.com या वेबसाईटवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करणे खूपच सोपे आहे.