मुक्तपीठ टीम
वैद्यकीय क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. अमेरिकेतील डॉक्टरांनी वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदा डुकाराच्या हृदयाचे मानवी शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केलं आहे. अमेरिकेच्या डॉक्टरांनी ५७ वर्षांच्या एका रुग्णावर जेनेटिकली मोडिफाइड डुकराच्या ह्रदयाचं प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने दिलेल्या माहितीनुसार, ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया शुक्रवारी करण्यात आली.
डुकराच्या ह्रदयाचं मानवी शरीरातील यशस्वी प्रत्यारोपणाला ऐतिहासिक घटना म्हटलं जात आहे. या प्रत्यारोपणानंतरही रुग्णाचा आजार बरा होण्याची शक्यता सध्या तरी निश्चित नसली, तरी प्राण्यांपासून मानवांमध्ये झालेल्या प्रत्यारोपणाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे.
नेमकं का, कुठे, कसं घडलं?
- रुग्ण डेविड बेनेट यांची प्रकृती मानवी ह्रदय प्रत्यारोपणासाठी योग्य नव्हती. मात्र, त्यांचा जीव वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
- आता रुग्ण बरा होत आहेत आणि डुकराचे हृदय त्यांच्या शरीरात कसे कार्य करत आहे यावर डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
- मेरिलँडमधील रहिवासी असलेल्या डेविड बेनेट यांनी शस्त्रक्रियेपूर्वीच्या एक दिवस अगोदर मला मरु द्या किंवा ह्रदय प्रत्यारोपण करा, असं म्हटलं होतं.
- ही अंधारात बाण मारण्यासारखी स्थिती असल्याची स्थिती होती.
- मात्र, ती माझी शेवटची पसंती असल्याचं त्यांनी म्हटलं.
- गेल्या काही दिवसांपासून डेविड बेनेट हे हार्ट लंग बायपास मशीनचा वापर करत होते.
- आता ठीक झाल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडण्यास इच्छूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“So you can CRISPR genome edit a pig’s heart so it can be successfully transplanted to a human?”
“That’s right, we just did it”https://t.co/oM2SwpCa5r first-in-man
by @RoniNYTimes pic.twitter.com/XMi9OEcI6t— Eric Topol (@EricTopol) January 10, 2022
मानवी शरीरात डुकराचं ह्रदय का?
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं पारंपारिक प्रत्यारोपणासाठी शरीराची स्थिती योग्य नसलेल्या रुग्णांसाठी शेवटचा पर्याय म्हणून डेविड बेनेट यांच्यावरीलशस्त्रक्रियेला परवानगी दिली होती.
प्रत्यारोपणासाठी मानवी अवयवाच्या कमतरतेवर मात होऊ शकेल…
डुकराचे हृदय मानवी शरीरात शस्त्रक्रियेने प्रत्यारोपित डॉ. बार्टले ग्रिफिथ म्हणाले: “ही एक यशस्वी शस्त्रक्रिया होती आणि अवयवांच्या कमतरतेची समस्या सोडवण्याच्या दिशेने आम्हाला एक पाऊल पुढे नेले आहे.”