मुक्तपीठ टीम
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने नुकतेच आपले पहिले 7 वर्षे मुदतीचे 300 दशलक्ष युरो किमतीचे बाँन्ड्स यशस्वीपणे जारी केले आहेत. युरो बाजारात भारतीय कंपनीने जारी केलेल्या या बाँन्ड्सना 1.841% इतके कमीत कमी उत्पन्न नक्की झाले आहे. त्यामुळे भारताचा पहिलाच युरो ग्रीन बाँड चांगलाच यशस्वी ठरला आहे.
हा भारताकडून जारी झालेला पहिला युरो ग्रीन बाँन्ड इन्शुरन्स आहे. तसेच बिगर बँकींग वित्तीय कंपनीने सुरु केलेला पहिला युरो इन्शुरन्स आहे, त्याशिवाय भारतातून 2017 नंतर जारी झालेला हा पहिला युरो बाँन्ड इन्शुरन्स आहे.
या विमाबाँन्ड्समध्ये 82 खात्यांसह सहभाग नोंदवत आशिया आणि युरोपातील संस्थागत गुंतवणूकदार सक्रीय सहभागी झाले असून त्याला 2.65 पट प्रतिसाद मिळाला आहे.