मुक्तपीठ टीम
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शतक पार केलं आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांना गाड्या चालवणे परवडत नाही आहे. त्याचवेळी जगात अनेक देश असे आहेत जिथे पेट्रोलची किंमत भारतापेक्षा स्वस्त आहे तर कुठे जास्त आहे. पण माचिसपेक्षाही स्वस्त पेट्रोल मिळणारा एक देश जगात आहे. तो म्हणजे व्हनेझुएला.
माचिसच्या किंमतीपेक्षाही स्वस्त पेट्रोल मिळतं या देशात
- जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएला येथे मिळते.
- येथे एक लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला फक्त ०.२ डॉलर म्हणजेच १ रूपये ५० पैसे खर्च करावे लागतील.
- तेथे पेट्रोल माचिसपेक्षाही स्वस्त आहे.
- डिसेंबरपासून भारतात माचिसची किंमत २ रूपये होणार आहे.
- जर तुम्ही व्हेनेझुएलामध्ये असाल तर, तुम्ही ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ३० लिटर पेट्रोल खरेदी करू शकता.
- मारुती सुझुकी अल्टो के१० ची ३५ लिटरची टाकी भरण्यासाठी तुम्हाला ५२ रूपये ५० पैसे रुपये खर्च करावे लागतील.
या देशांमध्ये सर्वात महाग पेट्रोल
- भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले असले तरीही त्यांची किंमत इतर देशांपेक्षा कमी आहे.
- जगातील सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये आहे.
- Globalpetrolprices.com च्या मते, सप्टेंबरमध्ये हाँगकाँगमध्ये पेट्रोलची किंमत २.५६ डॉलर म्हणजेच १९२ रुपये प्रति लिटर होती.
- युरोपियन देश नेदरलँड्समध्ये एक लिटर पेट्रोलसाठी २.१८ डॉलर म्हणजेच १६३ रुपये प्रति लिटर खर्च करावे लागतील.
- सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये पेट्रोलचा दर १६० रुपये प्रति लिटर आहे.
- त्याचप्रमाणे नॉर्वे, इस्रायल, डेन्मार्क, मोनॅको, ग्रीस, फिनलंड आणि आइसलँड या देशांचा समावेश आहे जेथे पेट्रोलचे दर खूप जास्त आहेत.