मुक्तपीठ टीम
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. दरात वाढ झाल्याने मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलने ९४ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. लवकरच हे दर शतक झळकवतील अशी शक्यता आहे.
पेट्रोलच्या दरात ३० पैसे, तर डिझेलच्या दरात २५ पैशांनी पेट्रोलियम कंपन्यांनी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ दिसून येत असल्यामुळे तेल कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला.
देशभरात कुठे, किती इंधन महागाई?
• मुंबईत पेट्रोलच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर पेट्रोल ९४.१२ रुपये आणि डिझेल ८४.६३ रुपये झाला.
• तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल ८७.६० रुपये आणि डिझेल ७७.७३ रुपये आहे.
• चेन्नईत पेट्रोलचा दर ८९.९६ रुपये आणि डिझेलसाठी ८२.९० रुपये दर आहे.
• कोलकात्यात पेट्रोल ८८.९२ रुपये आणि डिझेलचा दर ८१.३१ रुपये झाला आहे.
• बेंगळूरूमध्ये पेट्रोल ९०.५२ रुपये तर डिझेल ८२,९० रुपये झाला आहे.