मुक्तपीठ टीम
पाच राज्यातील निवडणुकांच्या कालावधीत गायब झालेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ ही आता सुरूच आहे. निवडणुकांनंतर या महिन्यात आठव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातीलही काही शहरांमध्ये यापूर्वीच पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०० रुपयांवर पोहोचले होते. पेट्रोलच्या दरात आज २९ पैशांनी वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर ३६ पैशांनी वाढ झाली आहे.
आज पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. मुंबई लवकरच पेट्रोलच्या दराचं शतक पार करण्याची शक्यता आहे.
| शहराचे नाव | पेट्रोल रुपये/लीटर | डीझेल रुपये/लीटर |
| मुंबई | ९८.६५ | ९०.११ |
| चेन्नई | ९४.०९ | ८७.८१ |
| कोलकाता | ९२.४४ | ८५.७९ |
| दिल्ली | ९२.३४ | ८२.९५ |








Subscribe