मुक्तपीठ टीम
सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दरवाढ करून कंपन्यांनी सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. आज या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल १०१.५२ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. या वाढीमुळे आता देशातील ६ राज्यात पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमतही १०० रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. मे महिन्यात पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत थोपवण्यात आलेली इंधन दरवाढ गेला महिनाभर सतत भडकत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या
गेल्या महिनाभर सुरू असलेल्या इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. वाढलेल्या दरानंतर दिल्लीत पेट्रोल २८ पैशांनी महाग होऊन ९५.३१ आणि डिझेल २७ पैशांनी वाढून ८६.२२ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहे. या महिन्यात आतापर्यंत पेट्रोल १ रुपये ८ पैसे आणि डिझेल १ रुपये ७ पैसे महाग झाले आहे.
६ राज्यामध्ये पेट्रोल शंभरीपार
• देशातील ६ राज्यात पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.
• महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यात पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचले आहे.
• त्याचबरोबर तेलंगणा आणि लडाखमध्ये बर्याच ठिकाणी पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.
पेट्रोल डिझेल आणखी भडकणार
• कित्येक देशांत लॉकडाऊन उघडल्यामुळे कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे.
• याशिवाय कच्च्या तेलाच्या निर्यातीसाठी इराणवर लादलेली बंदी उठवली नाही.
• त्यामुळे देखील कच्च्या तेलाची किंमत सतत वाढत आहे.
• तत्कालीन ट्रम्प प्रशासनाने इराणवर घातलेल्या निर्बंधानंतर भारताने २०१९ च्या मध्यापासून इराणकडून तेल आयात करणे थांबवले.
• अमेरिकन अर्थव्यवस्था आता पूर्ण खुली करण्यात आली आहे. यासह युरोपियन देशांमध्ये निर्बंध कमी करण्यात आले आहेत. यामुळे पेट्रोलियम पदार्थांची मागणी वाढत आहे.
• हेच कारण आहे की सध्या कच्चा तेलाचे दर वाढत आहेत.
• अमेरिकन बाजारामध्ये कच्चा तेलाची किंमत प्रति बॅरल ७१.५७ वर पोहोचली आहे.
• येत्या काळात कच्च्या तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
• त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल आणखी महाग होऊ शकतात.