मुक्तपीठ टीम
सोलापुर परिषदेकडील प्राथमिक शिक्षण विभागाकडे विषय शिक्षक पदवीधर (समाजशास्त्र) या विषयाचे अतिरिक्त झालेल्या विषय शिक्षकांचे नकार मंजूर करून विषय शिक्षक पदवीधर (विज्ञान / गणित) या विषयाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्याचा प्रश्न गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न शिक्षकांच्या अगदी जिव्हाळ्याचा असल्यामुळे तो निकाली निघाल्यामुले सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे याबद्दल सर्व शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त केले आहे
विज्ञान विषयाच्या पदवीधर शिक्षकांच्या जागी समाजशास्त्र विषयाचे पदवीधर विषय शिक्षक गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत होते. शिक्षकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असल्याने विविध शिक्षक संघटनांनी या विषयाबाबत जिल्हा परिषदेकडे गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा केलेला होता. हा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सोलापूर जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ९ जून रोजी समुपदेशन प्रक्रिया ठेवली.
प्रत्येक तालुकास्तरावर संबंधित पदवीधरांना उपस्थित ठेवून जिल्हास्तरावरून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे उपस्थित शिक्षकांचे समुपदेशन घेण्यात आले. समुपदेशन प्रक्रियेची ही कार्यवाही २०१७च्या शासन निर्णया मधील दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार संपन्न झाली. या प्रक्रियेसाठी जिल्हास्तरावरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील एकूण पदवीधर शिक्षकांपैकी पदवीधर शिक्षक समुपदेशन प्रक्रिया साठी उपस्थित होते त्यापैकी पदवीधर शिक्षकांनी नकार दिलेल्या असून पदवीधर शिक्षक गैरहजर होते या प्रक्रियेतील एकूण पदवीधर शिक्षकांनी आपली शाळा निवडून विज्ञान विषय शिक्षक म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी आपली तयारी दर्शवली आहे. या प्रक्रियेबाबत शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा मध्ये दाखल केलेल्या याचिका क्र. १०७४४/२०१९ ची सुनावणी दिनांक २१/६/२२ रोजी असल्याने माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या या निकालाच्या अधीन राहून समुपदेशन प्रक्रियेचे आदेश संबंधित शिक्षकांना दिनांक २१/६/२२ नंतर देण्यात येतील या संपूर्ण प्रक्रियेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, अनिल जगताप, प्रताप रूपनर, हरिष राऊत, तजमुल मुतवली, अरुण पवार, श्री चांदर्गी, श्री प्रक्षाळे यांनी काम पाहिले.
वर्षानुवर्ष प्रलंबितअसलेला विज्ञान विषय शिक्षक समुपदेशनाद्वारे नियुक्तीचा विषय मार्गी लागल्याने विज्ञान आध्यापनची उत्तम सोय होईल यात शंका नाही. परंतु समुपदेशनासाठी नकार व गैरहजेरीचे प्रमाण लक्षणीय होते हे योग्य नाही, असे मत व्यक्त झाले.