मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश न केल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर हे समर्थक पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना भेटायला मुंबईला गेले. आज कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनातील त्यांचे बोलणे हे त्यांच्या आगामी वाटचालीत श्रद्धा आणि सबुरीला स्थान असेलच पण वेळंच आली तर त्या ज्यांना कौरव म्हणतात, त्यांचा नाश करण्यासाठी हाती राजकीय शस्त्र घेण्याची तयारीही असेल हे स्पष्ट करणारे होते. पंकजा मुंडेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मुंडेंसाहेबांनी प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी राजकारणात आणले!
• महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य कार्यकर्ते इथे आले आहेत.
• अनेक कार्यकर्ते त्यांच्या जिल्ह्यात आहेत.
• मार्गदर्शनाची वाट पाहत आहेत.
• कार्यकर्त्यांसमोर मी नतमस्तक. तुमचं ऋण मी फेडू शकणार नाही
• मुंडे साहेबांनी आयुष्यभर खस्ता खाऊन वंचितांना न्याय देण्याचे काम केले.
• तळागाळातील माणूस हा ग्राम पंचायत सदस्य ते आमदार, खासदार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले.
• गोपीनाथ मुंडे यांनी वंचितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम केलं
• मुंडे साहेबांनी मला फक्त परळीची आमदारकी मिळवावी म्हणून राजकारणात आणले नाही.
• त्यांनी लढा दिलेल्या प्रस्थापितांविरोधात उभे करण्यासाठी मला राजकारणात आणले.
प्रत्येक वंचित कार्यकर्ता माझा परिवार!
• मुंडे साहेबांनी मुलीला मंत्री करा, संत्री करा, या नातेवाईकाला करा हे मुंडे साहेबांचे संस्कार नाही.
• केवळ प्रीतम मुंडे म्हणजे माझा परिवार नाही. राज्यातील प्रत्येक वंचित कार्यकर्ता माझा परिवार आहे
• वडील जिंवत असताना मी राजकारणात आले.
• त्यांच्या चितेला अग्नी देताना अनेक लोक मला ढकलत होते.
• अनेकांनी मुंडण केले.
घोषणा ताकद देतात, पण आज घोषणांचे ‘हे’ स्थान नाही
• घोषणा देऊ नका, मला त्यातून ताकद जरूर मिळते, परंतू आज ते स्थान नाही.
• मी संघर्ष यात्रा काढली.
• मी त्यावेळी केलेलं भाषण तुम्ही ऐकलेलं असेल.
• त्यावेळी मी म्हणाले होते की, माझं भांडण नियतीशी आहे.
• मी मुंडे यांची वारस आहे आणि मला पद हवंय असं मी कधी म्हणाले का कधी?
• मंत्रीपद हे गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार नाही.
• जेव्हा माझं अस्तित्व पणाला लागलं होतं.
• माझ्याकडे शून्य ताकद होती.
• पायाखालची जमीन सरकलेली असताना मंत्रीपद नाकारणारी पंकजा मुंडे तुम्हाला राजीनामा द्यायला लावेल का?
• मला पदाची आणि सत्तेची लालसा नाही.
• मी तुमचे सर्वांचे राजीनामे नामंजूर करते. ते मी द्यायला सांगितले नव्हते.
मला तुमचं सगळं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे!
• दबावच आणायचा असता तर ही जागा मला पुरलीच नसती
• दिल्लीत माझी अनेकांशी चर्चा झाली.
• पण इथं मला झापल्याच्या बातम्या दिल्या गेल्या.
• माझ्या चेहऱ्यावरून असं वाटतंय का
• पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा झाली.
• त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याच्या सूचना दिल्या.
• आता मी दबाव आणून काय करणार आहे.
• मला तुमचं सगळं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे.
• तुम्ही माझ्या डोळ्यातलं पाणी बघून असं वागलात, मी तुमच्या डोळ्यात पाणी बघून कशी जगू.
मोठा नेता नेहमी त्याग करतो!
• माझ्या समाजातील किंवा तळागाळातील कुणी कार्यकर्ता मंत्री होत असेल तर मला आनंद नाही का त्याच्यामध्ये.
• मोठा नेता नेहमी त्याग करतो. मुंडे साहेबांनी हेच केलं.
• पक्षानं मला जे दिलं, ते पंकजाताई लक्षात ठेवेन. पण नाही दिलं ते मला सल्ला देणाऱ्यांनी लक्षात ठेवावं
• केंद्रीय मंत्रीपद मिळालं नसलं तरी आज मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री आहे.
• मूठ आपली शक्ती आहे. हीच शक्ती कमी करण्याचा डाव आपण कधी करु द्यायचा नाही.
योग्य निर्णय घ्यायची वेळही योग्य असते.
• मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही होता, आताही आहे.
• मी संपलेले नाही. संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते.
• मी तुमच्या जीवावर आहे.
• योग्य निर्णय घ्यायची वेळही योग्य असते. अविचारानं काही करायचं नसतं.
• पूर्ण पात्रता असताना प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नाही.
• आज आम्ही चाळिशीत आहोत. डॉ. कराड ६५ वर्षांचे आहेत.
• त्यांना मी अपमानित का करू?
कुणी म्हणतं मला पंतप्रधान व्हायचं आहे, ते चालतं का?
• माझ्या विरोधात बातम्या पेरल्या जात आहेत.
• कुणी म्हणतं मला पंतप्रधान व्हायचं आहे, ते चालतं का?
• माझ्या देशाच्या पंतप्रधानांनी , राष्ट्रपतींनी मला अपमानित केलं नाही.
• एकदा वाघीण म्हणता, कधी पंख छाटले म्हणता. नेमकं काय?
सुईच्या टोकाएवढीवाले कौरव हरले…युद्ध टाळणारे पांडव जिंकले!
• पांडवांनी धर्मयुद्ध जिकलं.
• पांडवावर अन्याय झाला होता की नाही?
• त्यांनी फक्त सात गावं मागितली होती.
• पण सुईच्या टोकाएवढीही जागा देणार नसल्याचं कौरव म्हणाले.
• पण तरीही पांडव जिंकले ना.
• त्यांनीच युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला.
• जो चांगला असतो, तो लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न करतो.
घर नाही सोडायचं, छत अंगावर पडेल तेव्हा बघू!
• आम्ही सगळं दु:ख भोगलंय.
• घर फुटल्याचं, पराभवाचं भोगलंय. कारण आम्ही कुणालाही भीत नाही.
• मी कोणाला भीत नाही.
• पण म्हणून कोणाचा अनादर का करू?
• माझे संस्कार निर्भय राजकारणाचे आहेत.
• आपलं घर आपण का सोडायचं?
• हे घर आपण प्रेमानं आणि कष्टानं बनवलंय?
• ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू
माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह!
• मला माझ्यासाठी, प्रीतमसाठी, अमित आणि यशस्वीसाठी काही नको. तुमच्यासाठी हवं.
• मी तुमच्या अलंकारांनी सजली आहे, तुमच्या आशीर्वादाने सजली आहे, मला कशाची गरज नाही.
• माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. जे. पी. नड्डा आहेत.
• त्यांच्या मनात काहीतरी चांगलं आहे असा मला विश्वास आहे.
कौरवांच्या सेनेतील अनेक मनानं पांडवांच्या सोबत!
• तुमची सगळी दु:खं माझ्या ओठीत टाका आणि आनंद घेऊन जा.
• माझा सन्मान मला सर्वात जास्त प्रिय आहे.
• आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठी उभे आहोत.
• मला आई व वडील अस दोन्ही भूमिकांमधून निर्णय घ्यावा लागतो.
• प्रत्येक गोष्ट कार्यकर्त्यांची ऐकून कसं चालेल?
• कौरवांच्या सेनेतील अनेक लोक मनानं पांडवांच्या सोबत होते.
• फक्त शरीरानं कौरवांच्या सोबत होते. कळलं का तुम्हाला?
जेव्हा मला वाटेल आता इथं राम नाही, तेव्हा बघू!
• आपल्या प्रवासाला एक स्वल्पविराम देऊ.
• हा उत्साह असाच राहू द्या.
• मला दबावतंत्र राजकारण जमतं नाही.
• तुम्ही माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहात.
• प्रीतमताईंसाठी तुम्ही काही करू नका.
• पद प्राप्त करणं हे आपलं मुख्य ध्येय नाही.
• वंचितांचा वाली बनण्याचं आपलं ध्येय आहे
• जेव्हा मला वाटेल आता इथं राम नाही, तेव्हा बघू.
• दोन घास कमी खाऊ.
• त्याग करायचा तिथं त्याग करू.
• पण एकजुटीनं व एक जीवानं राहू.