मुक्तपीठ टीम
चहाची तल्लफ लागली की पाय वळतात ते चहा पिण्यासाठीच. बहुसंख्यांची ही आवड ओळखून चहा विक्रीत व्यवसाय संधी शोधली जाते. नाशिकमधील गणेश कदम या व्यावसायिकानेही ‘पंचवटी अमृततुल्य’ या ब्रँडखाली चहा दुकानांची साखळी उभारण्यास सुरुवात केली आहे. तसं करताना केवळ स्वत:चं हित साधण्याचा गणेश कदम यांचा हेतू नसून या माध्यमातून तरुणांना रोजगार प्राप्त व्हावा, असेही त्यांचे प्रयत्न आहेत. एका मराठी व्यावसायिकाचा बिझनेस विथ मिशन हा चांगली बातमी ठरलाय.
गणेश कदम यांनी ‘पंचवटी अमृततुल्य’ चहा ब्रँड १५ डिसेंबर २०२० रोजी नाशिकमध्ये लाँच केला. एक चांगला दर्जेदार चहा ग्राहकांना देऊन महाराष्ट्रातच नाही तर देशभर साखळी उभारण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे ‘पंचवटी अमृततुल्य’ विक्री केंद्रांमध्ये स्वच्छता आणि दर्जा राखण्यावर कटाक्ष असतो. सगळ्या केंद्रांमध्ये एकाच चवीचा, ताजा चहा ग्राहकांना पुरवण्यासाठी त्यांनी खास यंत्रणा उभारली आहे. ग्राहकांना रेगुलर टी, ब्लॅक टी,शुगर फ्री टी,ग्रीन टी आणि कॉफी इत्यादी फ्लेवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पं पंचवटी वडापावचीही सुरुवात झाली आहे. पहिली शाखा सिन्नरचे सुरू करण्यात आली असून यापुढे पंचवटी अमृततुल्य आणि पंचवटी वडापाव या शाखा राज्यात विविध ठिकाणी सुरु करून रोजगार निर्मिती करण्याचा मानस असल्याचे गणेश कदम यांनी सांगितले.
गणेश कदम हे केवळ व्यावसायिक नाहीत. ते छत्रपती सेना ही संघटना तसंच छत्रपती फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहे. त्यामुळे तरुणांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी ते प्रयत्न करतात. कुठल्याही प्रकारची अनामत रक्कम न घेता ‘पंचवटी अमृततुल्य’ च्या माध्यमातून तरुणांना व्यावसायिक बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा गणेश कदम यांनी केला आहे.
आतापर्यंत ‘पंचवटी अमृततुल्य’ च्या राज्यात सोळा शाखा यशस्वीपणे कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या काळातही या सर्व शाखांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचा व्यवसाय राज्यात केल्याचा, कदम यांचा दावा आहे.
कृषि बाजार समित्यांमध्ये फक्त पाच रुपयात चहा!
हे सुरू असतानाही आपण शेतकऱ्याचे बळीराजाचे देणे लागतो लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे यासाठी सामाजिक भान म्हणून राज्यातील सर्व कृषी बाजार समितीमध्ये पाच रुपयात चहा देण्याचा त्यांचा मानस आहे. नाशिक जिल्ह्यातील कृषी बाजार समितीमध्ये दिवस-रात्र चोवीस तास पंचवटी अमृततुल्यच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्त्वानुसार शेतकऱ्यांना फक्त पाच रुपयात चहा दिला जातो. या माध्यमातून शेतकऱ्यांचे वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपये वाचतात. यासाठी बाजार समितीचे सभापती देविदासशेठ पिंगळे आणि संचालक मंडळाचे सहकार्य त्यांना मिळत आहे. यासाठी बाजार समितीने एक रूपया ही मोबदला न घेता मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील इतर बाजार समितीने जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी पाच रुपयात दर्जेदार चहा देण्याचा गणेश कदम यांचा मानस आहे.
सार्वजनिक रुग्णालयांसाठीही प्रयत्न
त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय येथे जागा उपलब्ध करून दिल्यास येणाऱ्या श्रमिक कष्टकरी कामगार आणि सर्वसामान्य जनतेला पाच रुपयात चहा देण्याचा पंचवटी अमृततुल्य चा मानस असल्याचे गणेश कदम यांनी सांगितले
स्वतंत्र व्यवसायासाठी अर्थ पुरवठा
राज्यात अतिशय कमी खर्चात दोन ते अडीच लाख रुपयात हा व्यवसाय सुरू करता येतो. अशा व्यवसायांसाठी मुद्रा लोन तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध आहे. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ किंवा इतर महामंडळाचे माध्यमातूनही व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पंचवटीची टीमही अशा तरुणांच्या प्रयत्नांचा मागोवा घेत असते.
चहाबरोबरच आता वडापावही!
• पंचवटी अमृततुल्य चहा ग्राहकांना चांगला उत्तम मिळावा यासाठी चहाची गुणवत्ता दर्जा उत्तम राखण्यासाठी पंचवटी अमृततुल्य टीम कायम प्रयत्नशील राहत असते
• पंचवटी अमृततुल्य च्या माध्यमातून ग्राहकांना रेगुलर टी, ब्लॅक टी,शुगर फ्री टी,ग्रीन टी आणि कॉफी इत्यादी फ्लेवर उपलब्ध करून देण्यात आले आहे
• त्याचप्रमाणे पंचवटी अमृततुल्य च्या माध्यमातून पंचवटी वडापाव पहिली शाखा सिन्नरचे सुरू करण्यात आली असून यापुढे पंचवटी अमृततुल्य आणि पंचवटी वडापाव या शाखा राज्यात विविध ठिकाणी सुरु करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती राज्यात करण्याचा मानस असल्याचे गणेश कदम यांनी सांगितले.
अनामत रक्कम न घेता शाखा
लॉकडाऊनच्या काळात हजारो कुटुंब उध्वस्त झाली हजारो तरुणांच्या नोकऱ्या गेल्यात. कुटुंब रस्त्यावर आले आता पुढे काय करावे असा प्रश्न कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्यासमोर उभा राहिला आहे. अशावेळी सामाजिक भान ठेवून पंचवटी अमृततुल्य शंभर शाखा होईपर्यंत कोणत्याही तरुणांकडून एक रुपयाही अनामत रक्कम न घेता त्यांना शाखा उपलब्ध करून दिली जाईल.