मुक्तपीठ टीम
अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटीतील वैज्ञानिकांनी पालकची अशी रोपं तयार केली आहेत, जी ईमेल करू शकतात. एमआयटीच्या वैज्ञानिकांनी नॅनोटेक्नॉलजीच्या मदतीने पालकची नवी वेगळी रोपं तयार केली आहेत. ही पालक सेन्सरचे काम करते जी स्फोटक पदार्थांना ओळखण्यास मदत करते. ही पालकची रोपं कोणत्याही स्फोटक पदार्थांची माहिती मिळाल्यानंतर तार किंवा कोणत्याही इतर यंत्राच्या सहाय्याविना आपली माहिती वैज्ञानिकांना पाठवू शकतील.
एमआयटीच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, “पालकच्या मुळांना जमिनीतील पाण्यात नायट्रोएरोमेटिक्स असल्याची माहिती मिळेल तेव्हा पालकच्या पानात असलेले कार्बन नॅनोट्यूब सिग्नल देतील.”
हे सिग्नल इन्फ्रारेड कॅमेर्याद्वारे वाचले जातील आणि वैज्ञानिकांपर्यंत तात्काळ एक अलर्ट मेसेज पोहोचेल. नायट्रोएरोमॅटिक्स हे एक कंपाऊंड आहे, जे भूसुरुंगासारख्या स्फोटकांमध्ये आढळते. हा प्रयोग इंजिनीअरिंग इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह विस्तृत संशोधनाचा एक भाग आहे.
या तंत्रज्ञानास ‘प्लांट नॅनोबॅायोनिक्स’ असे नाव देण्यात आले आहे आणि ते पालकला नवीन क्षमता प्रदान करीत आहेत. प्रा. मायकेल म्हणाले, “वनस्पतींची मुळे जमिनीच्या आत पसरलेली असतात आणि ते सतत जमिनीच्या आतील पाण्याचे नमुने घेत असतात आणि पाणी वाहून पानांपर्यंत नेण्याची क्षमता त्यांच्यात असते.” वनस्पती आणि मानव यांच्या संवादातील अडथळा दूर करण्याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
या संशोधनाचा उद्देश स्फोटकांचा शोध घेणे हे आहे, तसेच याच्या मदतीने वैज्ञानिकांना प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय परिस्थितीबद्दल माहिती मिळेल.
प्रोफेसर स्ट्रॅनो यांनी वनस्पतींमध्ये प्रदूषक शोधण्यासाठी नॅनो पार्टिकल्सचा वापर केला. यावेळी संशोधक नाइट्रिक ऑक्साईड शोधण्यात यशस्वी ठरले. हे प्रदूषक काही जळल्याने निर्माण होतात. स्ट्रॅनो म्हणाले की, “झाडे पर्यावरणदृष्ट्या खूप प्रतिक्रियाशील असतात.”
मातीतील बदल, दुष्काळ किंवा पाण्याच्या बदलाची संभाव्यता याची जाणीव होते. याद्वारे रासायनिक सिग्नल योग्य मार्गाने दर्शविले गेले तर मोठ्या प्रमाणात माहिती गोळा केली जाईल.
पालक हे कार्बन नॅनोशिट्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकते आणि ते धातूनिर्मित हवेच्या बॅटरी आणि इंधन सेल्सना अधिक प्रभावी बनविण्यासाठी मुख्य स्त्रोत किंवा उत्प्रेरक ठरु शकतात. सध्या वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीसाठी मेटल एअर बॅटरी अधिक प्रभावी पर्याय आहेत. शास्त्रज्ञांनी पालक यासाठी निवडले आहे कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह आणि नायट्रोजन आढळतात जे उत्प्रेरकाची भूमिका निभावण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे.
पाहा व्हिडीओ